शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
2
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
3
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
4
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
5
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
6
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
7
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
8
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
9
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
11
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
12
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
13
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
14
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
15
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
16
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
17
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
18
वांद्रे रेल्वे स्थानकालगतची ४५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त; प्रशासनाची धडक कारवाई 
19
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...

आता सरळ नाही उलटं धावा, वजन कमी करण्यासाठी परफेक्ट एक्सरसाइज!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 11:54 AM

फिट राहणं, वजन नियंत्रणात ठेवणं याबाबत अलिकडे लोक फारच सजग झालेले दिसतात. त्यामुळे काही लोकांचा भर एक्सरसाइजवर वाढला आहे.

(Image Credit : Daily Mail)

फिट राहणं, वजन नियंत्रणात ठेवणं याबाबत अलिकडे लोक फारच सजग झालेले दिसतात. त्यामुळे काही लोकांचा भर एक्सरसाइजवर वाढला आहे. फिट राहणं म्हटलं की, धावणं हा साधा-सरळ मार्ग कुणालाही माहीत असेल. वजन कमी करण्यासाठीही धावण्याला प्राधान्य दिलं जातं. पण आतापर्यंत तुम्ही सरळ धावण्याबाबतच ऐकलं असेल. मात्र आता एका शोधानुसार, उलटं धावल्याने वजन कमी करण्यास अधिक फायदा होतो. 

या अभ्यासात २६ महिलांना सहभागी करुन घेण्यात आले होते. या महिलांना जवळपास ६ आठवडे उलटं धावायला सांगण्यात आलं. यात ज्या महिला दररोज १५ ते ४५ मिनिटे सरळऐवजी उलटं धावत होत्या, त्या महिलांचं वजन २.५ टक्के कमी आढळलं. यूनिर्व्हर्सिटी ऑफ मिलान आणि कराडिफ यूनिव्हर्सिटीच्या काही अभ्यासकांचं म्हणनं आहे की, उलटं धावल्याने गुडघ्याची समस्याही कमी होते.

उलटं धावण्याचे फायदे

१) सरळ धावताना तुम्ही कंबर वाकवू शकता. याने तुम्हाला मान आणि पाठीचं दुखणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्याऐवजी उलटं धावण्यासाठी तुम्हाला जास्त ताठ रहावं लागतं आणि हीच स्थिती धावताना तुम्ही कायम ठेवता. जोर धावणाऱ्यांचा मूड नेहमी चांगला राहतो. असे लोक दिवसभर मेहनत करुनही फ्रेश दिसतात.

२) अभ्यासानुसार, उलटं धावल्याने तुम्ही तुमचं वजन लवकर कमी करु शकता. कारण उलटं धावल्याने तुमच्या २० टक्के कॅलरी जास्त बर्न होतात. धावणं ही सर्वात चांगली एक्सरसाइज मानली जाते. याने हृदयरोगांचाही धोका टाळता येऊ शकतो, असं वेगवेगळ्या शोधात सांगण्यात आलं आहे. तणावपूर्ण वातावरणात काम केल्यानंतर थोडं धावायला गेलात तुम्हाला फ्रेश वाटेल. 

३) उलटं धावण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागते, म्हणून याने तुमच्या शरीराची क्षमताही वाढते. त्यासोबच सरळ धावल्याने तुमच्या मेंदूचं लक्ष आजूबाजूला जाऊ शकतं. पण उलटं धावत असल्याने तुमचा मेंदू त्यातच गुंतलेला असतो. त्यामुळे तुमची एकाग्रताही वाढते. 

४) मेडिसन अॅंड सायन्स इन स्पोर्ट्स अॅंट एक्सरसाइजच्या एका रिपोर्टमध्ये, दररोज जॉगिंग करणाऱ्या १ लाख लोकांवर करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, जे दररोज २६.६ किमी चालतात, त्यांना अर्थारायटिसचा धोका कमी होतो. 

ब्रिटनमध्ये उलट्या दिशेने धावण्याची स्पर्धा आयोजित करणारे जेम्स बाम्बर सांगतात की, अशाप्रकारे धावण्याचे अनेक फायदे आहेत. उलटं धावण्यासाठी तुम्ही पायाच्या दुसऱ्या टोकावर जास्त भार दिला जातो. त्यामुळे तळपाय आणखी मजबूत होतात. तसेच शरीराची बांधाही सरळ होतो. बाम्बर यांच्यानुसरा, उलटं धावणाऱ्यांना एका निर्धारित अंतरापर्यंत धावल्यावर जो फायदा होतो, तो सामान्यपणे धावणाऱ्यांच्या कितीतरी जास्त असतो.  

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स