(Image Credit : studexasia.wordpress.com)
प्रत्येकाचीच इच्छा असते की, त्यांची त्वचा नेहमी चमकदार आणि सुंदर रहावी. यासाठी महिला कित्येक महागड्या प्रॉडक्ट्सचा आणि सोबतच घरगुती उपायांचा वापर करतात. पण आता अशा गोष्टीचा शोध लावण्यात आला आहे ज्याने त्वचा नेहमी तरूण राहील आणि तुम्ही नेहमी तरूण दिसाल.
(Image Credit : iAfrica.com)
वैज्ञानिकांनी COL17A1 नावाचं एक प्रोटीन शोधलं आहे आणि याबाबत त्यांनी दावा केला आहे की, याने त्वचा नेहमी तरुण राहील. नुकत्यात करण्यात आलेल्या रिसर्चमधून समोर आले की, हे प्रोटीन त्वचेला आहे तसंच ठेवतं आणि त्वचा वृद्ध होऊ देत नाही. हा रिसर्च टोकियोतील मेडिकल अॅन्ड डेंटल यूनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आला.
(Image Credit : Eminence Organic Skin Care)
या रिसर्चमध्ये शरीरात होणाऱ्या सेल कॉम्पिटिशन म्हणजेच पेशींमध्ये ज्या प्रतिस्पर्धा होतात त्यावर लक्ष केंद्रीत केलं. आपल्या शरीरासोबतच त्वचेतही सेल्स म्हणजेच पेशी तयार होत असतात आणि त्या नष्टही होत असतात. जर काही सेल्स पातळ आणि कमजोर असतील तर हे प्रोटीन त्यांना मजबूत करण्यात मदत करतं.
(Image Credit : vanitynoapologies.com)
त्वचेवर सूर्याची यूव्ही किरणं पडल्याने त्वचेवर वाईट प्रभाव पडतो आणि या स्थितीत पेशी आणखीही कमजोर होतात. अर्थातच याने त्वचाही कमजोर होते आणि त्यामुळे सहजपणे डॅमेजही होऊ शकते.
जर्नल नेचरमध्ये प्रकाशित हा रिसर्च उंदरांवर करण्यात आला होता. या उंदरांची त्वचा मनुष्याच्या त्वचेशी फार मिळती जुळती होती. या प्रोटीनचं महत्त्व ठरवल्यावर टीमने हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, जर त्वचेमध्ये COL17A1 प्रोटीनचा स्तर कमी झाला तर तो पुन्हा वाढवता येऊ शकतो का? म्हणजे त्यांनी अशा तत्वांचा शोधा सुरू केला ज्याने वाढतं वय थांबवलं जाऊ शकेल.
यासाठी अभ्यासकांनी दोन रसायने Y27632 आणि एपोसिनिन एकत्र केले आणि दोन्ही प्रकारच्या त्वचेच्या पेशींवर टेस्ट केली. याचा परिणाम सकारात्मक राहिला. अभ्यासकांना आढळलं की, या रसायनांच्या प्रयोगानंतर त्वचेमधये होणाऱ्या जखमांवर त्यांचा फार प्रभाव बघायला मिळला. या रसायनामुळे त्वचेवरील घाव ठिक झाले.