(Image Credit : Best Life)
वय वाढणं आणि ते दिसणं हे आपल्या आयुष्यातील न पुसता येणारं सत्य आहे. केस पांढरे होण्यासोबतच चेहऱ्यावर सुरकुत्याही पडतात. आणखीही असे अनेक संकेत आहेत, ज्याने वाढतं वय दिसू लागतं. पुरूषांनाही ही बाब लागू पडते. पण तुम्हाला जर तुमच्या वयापेक्षा कमी वयाचं म्हणजेच तरूण दिसायचं असेल तर काही टिप्स फॉलो करा. या टिप्स नियमित फॉलो कराल तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल.
सोपी गोष्टी समजून घ्या
(Image Credit :He Spoke Style)
एजिंगसोबत लढण्यासाठी एक रुटीन तयार करणे, तो फॉलो करणे आणि त्यावर टिकून राहणे गरजेचं आहे. दिवसातून दोन वेळा एखाद्या चांगल्या फेसवॉशने चेहरा चांगला स्वच्छ करा आणि मॉइश्चराइज करा. याने त्वचा स्वच्छ होईल आणि बारीक सुरकुत्याही दूर होतील. तुम्ही तुमच्या स्कीन टाइपनुसार फेस वॉशची निवड करा.
सनस्क्रीन लावा
(Image Credit : Skincare.com)
उन्हात जास्त राहिल्याने त्वचेशी संबंधित वेगवेगळ्या समस्या म्हणजे प्री-मॅच्येअर एजिंग, डाग पडणे आणि त्वचेचा कॅन्सरही होऊ शकतो. उन्हामुळे एजिंगची प्रक्रिया वेगाने होऊ लागते. कारण कोलाजनला तोडून नवीन पेशी वाढणं बंद होतं. यापासून बचाव करण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे सनस्क्रीन. कमीत कमी एसपीएफ २० किंवा त्यापेक्षा जास्त एसफीएफ असलेलं सनस्क्रीन लावावं.
कपड्यांवर लक्ष द्या
(Image Credit : North BangalorePost)
सैल कपडे घालणे टाळा. सोबतच तुम्हाला फिट न येणारे कपडेही घालू नका. अशा शर्टची निवड करा ज्याने तुमची पर्ननॅलिटी खुलून येईल. जर तुमचं वजन जास्त असेल तर कपडे फार महत्त्वाचे ठरतात. जर तुम्हाला वाटत असेल की, सैल कपड्याने तुम्ही तुमचा लठ्ठपणा लपवू शकता तर तुम्ही चुकताय. असं केल्याने तुम्ही अधिक मोठे वाटाल. हॅंडसम आणि स्मार्ट दिसण्यासाठी फिट कपडे वापरा.
शुगर कमी करा
(Image Credit : WebMD)
जास्त साखर खाल्ल्याने त्वचेवर सुरकुत्या वाढतात आणि पाणी कमी होऊ लागतं. सोडा, कॅंडी, डेझर्ट हे पदार्थ टाळा. त्यासोबतच ज्यूस, प्रोटीन बार, धान्य इत्यादींपासून तयार पदार्थांमध्ये शुगरचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे अशा पदार्थांचं सेवन करा ज्याने तुम्ही तरूण दिसाल.
(Image Credit : Sharecare)
कोणत्याही फेसवॉश किंवा क्रीमचा वापर करू नका. एक चांगलं स्कीन केअर रूटीन फॉलो करा. ज्यात क्लीजिंग, एक्सफोलिएटिंग, हायड्रेटिंग आणि त्वचेची सुरक्षा यांचा समावेश असेल. पुरूषांची त्वचा ही महिलेंच्या त्वचेपेक्षा वेगळी असते. त्यामुळे त्वचेच्या समस्याही वेगवेगळ्या असतात. त्या समजून घेतल्या पाहिजे. महिलांच्या स्कीन केअर प्रॉडक्टचा वापर करू नका. जिममधून, बाहेरून आल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवावा किंवा आंघोळ करावी.