बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडनेकरने जेव्हा सिनेमात काम केलं तेव्हा कुणीही विश्वास ठेवायला तयार नव्हतं की, इतकी वजनदार अभिनेत्रीही ग्लॅमरस दिसू शकते. पण भूमीने आपल्या वेटलॉसने सर्वांनाच चकीत करुन सोडले. पण तिच्यासाठी हे अजिबात सोपं नव्हतं हे काही तुम्हाला वेगळं सांगायला नको. कारण वजन कमी करण्यासाठी किती आणि काय धडपड करावी लागते हे तुम्हीही करुन पाहिलं असेलच. पण भूमीने वजन करण्यासाठी अजिबात घाई केली नाही. त्यासाठी तिने प्लॅनिंगने काम केलं. चला जाणून घेऊ वजन कमी करण्याचा तिचा फंडा काय आहे.
वजन कमी करण्यासाठी भूमी पेडनेकरने तिच्या एक्सरसाइजसोबतच डाएटवर फोकस केलं. यासाठी तिने तिच्या खाण्या-पिण्याच्या सवयीही बदलल्या. भूमीच्या आहारात काही पदार्थ नव्याने आले तर काही दूर केले गेले. जसे की, आहारात गव्हाच्या चपात्यांऐवजी मल्टीग्रेन चपात्या आल्या. भाताची जागा राजगिऱ्याने घेतली. तळलेल्या-भाजलेल्या पदार्थांची जागा उकळलेल्या भाज्यांनी घेतली. सोबत ऑलिव्ह ऑईलचा आपल्या डाएटमध्ये समावेश केला.
भूमीने आपलं वजन कमी करण्याची सुरुवात बॉडी डिटॉक्सने केली. यासाठी ती रोज सकाळी उठून कोरफडीचा ज्यूस पित होती. या ज्यूसमुळे वजन वाढल्याने तिच्या शरीरात वाढलेले टॉक्सिन दूर होण्यास मदत झाली. तसेच सोबतच ती रोज दोन कप ग्रीन टी सुद्धा पित होती.
या गोष्टी केल्या बंद
भूमीने बाहेरचं खाण्यासोबत चीज, बटर आणि जंक फूट खाणे बंद केले. साखरेला आपल्या डाएटमधून दूर केले आणि त्याजागी डाएटमध्ये खजूराचं सिरप, मध आणि गुळाचा समावेश केला.
काकडीचं पाणी पिणे सुरु केलं
वजन कमी करण्यासाठी भूमीने तिच्या लिक्विड डाएटवर फार जास्त फोकस केला होता. यासाठी तिने स्वत:चं एक डिटॉक्स ड्रिंकही सुरु केलं होतं. एक लिटर पाण्यामध्ये ती तीन काकड्या कापून टाकत होती. सोबतच यात काही पुदीन्याची पाने आणि ४ लिंबाचा रसही टाकत होती. हे पाणी फ्रिजमध्ये थंड करुन दिवसभर पित होती.
भूमीचं डेली रुटीन
सकाळी वॉक, दुपारी जिम आणि सायंकाळी वॉलीबॉल, बॅटमिंटन किंवा स्विमिंगसोबत ती डान्स करत होती.
खूप भूक लागल्यावर स्ट्रॉबेरी आली कामी
भूमीने एका मुलाखतीत सांगतिले होते की, जेव्हा तिला खूप जोरात भूक लागते तेव्हा ती मिक्सरमध्ये एक ग्लास पाणी, २ चमचे दही आणि त्यात काही स्ट्रॉबेरीज मिश्रित करुन ज्यूस तयार करते. याने लगेच एनर्जी मिळते. अनेकदा डार्क चॉकलेटही मिळते. कारण त्यात ७० टक्के कोकोआ, थोडी साखर आणि खूपसारे अॅंटी-ऑक्सिडेंट असतात.
असा होता रोजचा डाएट प्लॅन
ब्रेकफास्ट - वर्कआऊटनंतक भूमी मल्टीग्रेन ब्रेडसोबत ३ अंड्यांचा पांढरा भाग खात होती. त्यासोबतच ती दूध तिच्या ब्रेकफास्टचा मुख्य भाग होता. अनेकदा चणे, चिकन, फिश किंवा उकळलेल्या रंगीबेरंगी भाज्याही ती खात होती.
लंच - भाजी, पोळी, चिकन-भात किंवा केवळ डाळ-भात हे तिच्या लंचमध्ये असायचं. यात एका वाटी भाजी, दोन चपात्या आणि एक ग्लास छाछ याचा समावेश होता. पण चपाती ती गव्हापासून तयार खात नव्हती.
४ वाजता नंतर स्नॅक्स - अर्धी पपई, पेरु ही फळे खात होती. १ कप ग्रीन टीसोबत ती अक्रोड किंवा बदामही खात असे. सायंकाळी ७ वाजता ती एक वाटी सॅलड खात असे, ज्यात भाज्या आणि ड्रायफ्रूट्स असत.
डिनर - भूमि रात्रीचं जेवण ८ वाजता करते. या जेवणात सीफूड, पनीर आणि वाफवलेल्या भाज्यांचा समावेश होता. त्यासोबतच ती एक छोटी वाटी ब्राऊन राइसही खाते.