'चेहरा है या चांद खिला है...' हे प्रसिद्ध गाणं आपल्यापैकी सर्वांनीच ऐकलं असेल. या गाण्यामध्ये चेहऱ्याची तुलना चंद्राच्या सौंदर्यासोबत केली आहे. परंतु, तुम्हाला हेही माहीत असेल की, चंद्रावरही डाग असतात आणि तसचं चेहऱ्यावरील डाग म्हणजे पिंपल्स. चेहरा कितीही सुंदर असो परंतु सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये मुलगा असो किंवा मुलगी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. खासकरून सध्याची तरूणाई पिंपल्सच्या समस्येने त्रस्त आहे. एवढचं नाहीतर चेहऱ्यावर आलेला पिंपल लवकरात लवकर दूर व्हावा म्हणून अनेक लोक ते सर्रास फोडण्याचाही प्रयत्न करताना दिसतात. पण पिंपल्स फोडण्यामुळे समस्या आणखी वाढते.
आज आम्ही तुम्हाला या समस्येबाबत काही गोष्टी सांगणार आहोत. जर तुम्हीही पिंपल्सच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्हाला सर्वात आधी पिंपल्स फोडणं बंद केलं पाहिजे. पिंपल्स फोडल्यामुळे चेहऱ्यावर डाग राहतात आणि चेहऱ्याचा लूक बिघडतो. जर तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स जास्त येत असतील तर मात्र त्वचा त्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.
पिंपल्स फोडल्यामुळे त्वचेला होणारं नुकसान... 1. पिंपल्स फोडल्यामुळे त्यातून निघणारं पाणी आजूबाजूच्या त्वचेवर पसरतं. त्यामुळे त्वचेच्या त्या भागामध्ये इन्फेक्शन वाढण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे भयंकर इन्फेक्शनही होऊ शकतं.
2. तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही जेव्हा पिंपल फोडता. तेव्हा पिंपल असलेल्या त्वचेवर जखम होते. ही जखम वेळेसोबत वाढत जाते आणि त्याजागेवर डाग तयार होतो.
3. पिंपल फोडल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर लाल रंगाचे डाग तयार होतात. जे बरेच दिवस त्वचेवर राहतात. एवढचं नाहीतर हे डाग मेकअप केल्यानंतरही लपवणं अवघड होतं.
4. सर्वा महत्त्वाचं म्हणजे, जर तुम्ही चेहऱ्यावरील एक पिंपल फोड असाल तर एक पिंपल फोडल्याने चेहऱ्यावर आणखी पिंपल्स येतात.
पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय :
जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर तुम्हाला काही घरगुती उपाय ट्राय करणं आवश्यक आहे. ज्यामुळे ते लगेच ठिक होण्यास मदत होईल...
1. पिंपल्सची समस्या दूर करायची असेल तर तुम्हाला चंदन आणि हळदीमध्ये दूध एकत्र करून पेस्ट तयार करा. यामुळे तुम्हाला पिंपल्स दूर करण्यास मदत होईल, तसेच पाण्यासोबत जायफळ उगळून लावल्यानेही अॅक्ने आणि पिंपल्स दूर होतात.
2. ज्या व्यक्ती चेहऱ्यावरील पिंपल्सच्या समस्येने हैराण आहेत. त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी चेहरा व्यवस्थित स्वच्छ करणं आवश्यक असतं. त्यासाठी एक चमचा काकडीच्या रसासोबत हळद एकत्र करून चेहऱ्यावर लावा आणि आर्ध्या तासाने चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या.
4. पिंपल्स दूर करण्यासाठी एक चमचा जिऱ्याची पेस्ट अत्यंत फायदेशीर ठरते. ज्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील त्यांनी ही पेस्ट जवळपास एक तासासाठी चेहऱ्यावर लावणं फायदेशीर ठरतं.
5. पिंपल्स ठिक करण्यासाठी कडुलिंब अत्यंत फायदेशीर ठरतं. त्यासाठी चेहऱ्यावर कडुलिंबाचा फेसपॅक लावा. त्यासाठी तुम्ही ताजी कडुलिंबाची पानं आणि चंदनाची पावडर एकत्र करून लेप तयार करून चेहऱ्यावर लावू शकता. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून टाका.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)