'फॅबूलस लाईव्स वर्सेज बॉलिवूड वाईव्स' या OTT सीरीजमध्ये बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या पत्नी आणि अभिनेत्रींबाबत अनेक गॉसिप्स ऐकायला मिळतात. या सीरीजमध्ये अभिनेत्री नीतू सिंह यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी, नीलम कोठारी सोनी, सीमा सजदेह आणि भावना पांडेसोबतच शालिनी पासी यांचाही समावेश आहे. शालिनी दिल्लीतील मोठे उद्योगपती संजय पासी यांची पत्नी आहे.
सध्या शालिनी पासी तिच्या सौंदर्यामुळे आणि तिच्या आलिशान लाइफस्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तिने अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अशाच एका व्हिडिओत शालिनीने तिच्या सुंदरतेचं गुपित सांगितलं आहे. यात तिने एका डिटॉक्स ड्रिंकबाबत सांगितलं आहे. जे काही मसाल्यांच्या पावडरपासून तयार केलं जातं. ज्यात पाणी आणि लिंबाच्या रसाचाही समावेश असतो. ज्याने शरीराला ऊर्जा मिळते. चला जाणून घेऊ कसं तयार कराल हे डिटॉक्स ड्रिंक.
डिटॉक्स पावडर कसं बनवाल?
शालिनी पासीचा डिटॉक्स मसाला काळ्या मिठापासून तयार होतो. तिने पाणी आणि लिंबाच्या रसासोबत काळं मीठ मिक्स करून नॅचरल डिटॉक्सच्या रूपात वापरण्याचा सल्ला दिला आहे. याने शरीरातील अॅसिडिटी कमी होते, शरीरात अल्कालाईन तयार होतं आणि शरीरातील विषारी तत्व बाहेर निघण्यास मदत मिळते.
त्वचा होईल चमकदार
शालिनीने सांगितलं की, याचा वापर केल्यावर तुम्हाला स्पामध्ये पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही. तुम्ही जर भारतीय असाल तर काळं मीठ सगळ्यात बेस्ट डिटॉक्स आहे. फक्त ते पाणी आणि लिंबाच्या रसात व थोड्या ओव्यासोबत सेवन करावं.
कसं कराल सेवन?
एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस टाका. आता या पावडरचा छोटा चमचा पाण्यात टाकून मिक्स करा. मिक्स पावडर रेसिपी
५०० ग्रॅम जिरं
५०० ग्रॅम ओवा
२ चमचे काळं मीठ
५० ग्रॅम दालचीनी
५ चमचे त्रिफळा
या सगळ्या गोष्टी मिक्स करून पावडर तयार करा. रोज सकाळी कोमट पाणी आणि लिंबाच्या रसासोबत मिक्स करू सेवन करा.