काही लोक दाढी वाढवणे पसंत नसतं. तर काहींना क्लीन शेव्ह ठेवणं पसंत नसतं. त्यामुळे थोडी दाढी वाढली की, ते शेव्हिंग करतात. पण जास्त शेव्हिंग करणे आणि चुकीच्या पद्धतीने शेव्हिंग करणे तुम्हाला महागात पडू शकतं. चेहऱ्यावर पिंपल्स, रॅशेज, बॅक्टेरिअल इन्फेक्शनसारखे स्किन प्रॉब्लेम होतात. या समस्या दूर ठेवण्यासाठी दाढी करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊया काही खास टिप्स....
1) शेव्हिंग आधी हे कराजेव्हाही तुम्हाला शेव्हिंग करायचं असेत तेव्हा चेहरा स्वच्छ धुवून घ्या. जर साबण किंवा फेसवॉश नसेल तर पाण्यानेही चेहरा धुतल्यास हरकत नाही. याने चेहऱ्यावरचं एक्स्ट्रा ऑईल निघून जातं आणि शेव्हिंग क्रिमचं इन्फेक्शन कमी होतं.
2) योग्य ब्रश निवडाशेव्हिंग करण्याचा ब्रश विचारपूर्वक निवडणे फायद्याचं ठरेल. जर ब्रश जुना झाला असेल आणि शेव्हिंग करताना समस्या येत असेल तर तो वेळीच बदला. चुकीच्या ब्रशमुळे तुम्हाला स्कीन इन्फेक्शन होऊ शकतं.
3) रेजर कसं असावंतुमच्या स्कीनच्या गरजेनुसार रेजरची निवड करावी. टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नका. जे रेजर तुम्हाला सूट होईल तेच वापरा. रेजर वापरण्याआधी ते 5 मिनिटे कोमट पाण्यात बुडवून ठेवा. याने रेजरवरील सर्व किटाणू निघून जातात आणि स्किन इन्फेक्शनपासून बचाव होतो.
4) शेव्ह करण्याची दिशाजर तुमची दाढी करण्याची दिशा योग्य असेल तर तुम्हाला अनेक स्किन प्रॉब्लेमपासून सुरक्षा मिळू शकते. जर तुम्हाला पिंपल्स होत असतील तर दाढी नेहमी वरुन खालच्या दिशेने करायला हवी. रेजरचा आरामात फिरवा.
5) आफ्टर शेव्हचा करा वापरशक्य झाल्यास दाढी केल्यानंतर आफ्टर शेव्ह क्रिमचा वापर करणे गरजेचे आहे. या क्रीममळे स्कीन इन्फेक्शनपासून बचाव होतो. चेपऱ्यावरील किटाणूही याने नष्ट होतात.