अलिकडे आपल्या कलाकाराप्रमाणे किंवा खेळाडूंप्रमाणे दाढी वाढवण्याची क्रेझ चांगलीच वाढली आहे. म्हणजेच बिअर्ड लूकचा ट्रेन्ड त्यांचे फॅन्सही फॉलो करत आहे. वेगवेगळ्या रिसर्चमधूनही हे समोर आलं आहे की, दाढी असलेले पुरूष महिलांना आकर्षित करतात. पण काहींना असा लूक हवा असूनही ठेवता येत नाही. कारण त्यांना एकतर दाढीवर पूर्ण केस येत नाहीत किंवा दाढीचे केस दाट नसतात. पण या गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. कारण आम्ही दाढीचे केस दाट करण्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत.
दालचिनीने वाढवा केस
दालचिनीचा वापर घरात वेगवेगळे पदार्थ तयार करताना केला जातो. पण दालचिनीचे आणखीही काही फायदे आहेत. दालचीनी केस वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. दालचिनीचं पावडर लिंबाच्या रसात मिश्रित करून एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर 15 मिनिटांसाठी लावा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. जर तुमच्या त्वचेला लिंबूची अॅलर्जी असेल तर याचा वापर करू नका. असे केल्यास तुमच्या त्वचेवर जळजळ होईल.
खोबऱ्याच्या तेलाने मिळवा परफेक्ट लूक
कडीपत्त्याची पाने खोबऱ्याच्या तेलात टाकून उकळून घ्या. जेव्हा तेल थंड होईल तेव्हा त्या तेलाने दाढीची मालिश करा. तसेच आवळा पावडर आणि खोबऱ्याचं तेल मिश्रित करा. आवळ्याचं प्रमाण 25 टक्के असावं. हे 2 मिनिटे उकळून घ्या. तेल थंड झाल्यावर त्याने दाढीची मालिश करा.
दाढीसाठी आवळा फायद्याचा
दाढीवरील केस वाढवण्यासाठी आवळ्याच्या तेलाने दाढीची मालिश करणे एक चांगला पर्याय आहे. आवळ्याच्या तेलाने रोज चेहऱ्यांची 20 मिनिटे मालिश करा. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. आवळ्याच्या तेलासोबत राईची काही पाने मिश्रित करून पेस्ट तयार करा. त्यात एक थेंब आवळा तेल टाका. हे मिश्रण दाढीवर लावा. 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा. आठवड्यातून तीन-चार वेळ हे करा.
व्हिटॅमिन्सचं सेवन करा
जास्त प्रोटीन असलेले पदार्थ सेवन केल्यास दाढी वेगाने वाढू शकते. कारण प्रोटीन्समध्ये केस वाढवण्याचे पौष्टिक तत्व असतात. तुमच्या आहारात ब्यूटी प्रॉडक्टमध्ये व्हिटॅमिन बी चा समावेश करा.
काय करावे उपाय?
- रोज रात्री कच्चे दूध दाढीवर लावून झोपा. यामुळे केसांची वाढ होईल.
- नियमितपणे गाजराचा ज्यूस घ्या अथवा डाएटमध्ये गाजराचा समावेश करा.
- थोडीशी काळी मिरी पावडर, मध आणि लिंबूचे मिश्रण करुन चेहऱ्यावर लावा. ५ मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.