(Image Creadit : offthegridnews.com)
हिवाळा सुरू झाला की, त्वचेसंबंधीच्या अनेक तक्रारींचा सामना करावा लागतो. अशातच सर्वांना उद्भवणारी समस्या म्हणजे ड्राय स्किनची. थंडीमध्ये वातावरण शुष्क असल्यामुळे स्किन ड्राय होते. अशा स्किनपासून सुटका करून घेण्यासाठी मग बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रोडक्ट्सचा वापर करण्यात येतो. अशावेळी वेगवेगळ्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करण्याऐवजी तुम्ही काही घरगुती उपायांनी या समस्येपासून सुटका करून घेऊ शकता. जाणून घेऊया अशा काही उपायांबाबत जे थंडीतही तुमची ड्राय स्किनपासून सुटका करण्यास मदत करतील...
1. खोबऱ्याचं तेल
स्किन मुलायम करण्यासाठी आणि करोडी होऊ नये म्हणून खोबऱ्याच्या तेलाने मालिश करा. त्यामुळे स्किन ड्राय होण्यापासून बचाव होईल. दररोज खोबऱ्याच्या तेलाचा वापर केल्याने रक्तप्रवाह ठिक होऊन चेहऱ्यावर ग्लो येण्यासही मदत होते.
2. बेसन आणि तेल
बेसन, तेल आणि मलई एकत्र करून चेहऱ्यावर लावल्याने ड्राय स्किनची समस्या दूर होते. हिवाळ्यामध्ये साबणाचा वापर करण्याऐवजी ही पेस्ट चेहऱ्यावर लावणं फायदेशीर ठरतं.
3. ड्राय स्किनसाठी फेस पॅक
हिवाळ्यामध्ये स्किन मुलायम ठेवण्यासाठी 1 चमचा मध, दोन मोठे चमचे दूधाची पावडर आणि कोरफडीचा गर एकत्र करून चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटांनंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका.
4. त्वचा मुलायम करण्यासाठी
स्किन मुलायम करण्यासाठी डाएटमध्ये बदामचे दूध, पनीर आणि तूपाचा समावेश करा. याचसोबत दिवसातून कमीतकमी 7 ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा.