(Image Credit : agein.com)
उन्हाळ्याला सुरूवात होत नाही तर लोक त्वचेबाबत चिंतेत असतात. चेहरा आणि शरीरावर घामोळ्या, लाल पुरळ, पिंपल्स, काळे डाग अशा अनेक समस्या होऊ लागतात. अशात लोक त्वचेचं सौंदर्य कायम ठेवण्यासाठी रोज क्लिनजिंग, टोनिंग आणि मॉइश्चराइजचा आधार घेतात. उन्हाळ्यात घाम खूप येतो आणि याने त्वचा ऑइली होते. उन्हही फार धारदार असतं याने त्वचा जळते. अशात त्वचेची काळजी कशी घ्यावी याच्या काही टिप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
उन्हापासून बचाव - सूर्याच्या प्रखर किरणांपासून बचाव करण्याचा प्रयत्न करा. हा बचाव तुम्ही सनस्क्रीन लोशन लावून करू शकता. एक चांगलं सनस्क्रीन एसपीएफसोबत येतं. जसे की, एसपीएफ २०, एसपीएफ २४, एसपीएफ ३० एसपीएफ ४०. तज्ज्ञांनुसार, भारतीय त्वचेसाठी ३० एसपीएफ असलेलं सनस्क्रीन चांगलं असतं. जर तुम्हाला घराबाहेर जायचं असेल तर जवळपास २० ते ३० मिनिटांआधी सनस्क्रीनला चेहरा आणि हात-पायांवर लावा.
स्वच्छतेवर लक्ष द्या - त्वचा ही फार नाजूक असते. त्वचेला कोणत्याही प्रकारची समस्या होऊ नये, यासाठी त्वचेची काळजी घेणे, स्वच्छता करणे गरजेचं आहे. आठवणीने दोनदा क्लिनजिंग, टोनिंग आणि मॉइश्चराइज करण्याची सवय लावा.
स्क्रबचा करा वापर - तुमची त्वचा उन्हाळ्यात रफ आणि टफ होते का? जर तुमचं उत्तर होय असेल तर मृत त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी स्क्रब करणे सुरू करा. स्क्रब केल्याने डेड आणि ओल्ड स्कीन दूर होते. तेच हातांच्या कोपरासाठी आणि गुडघ्यांसाठी तुम्ही साखरेसोबत लिंबाने हलक्या हाताने मसाज करा.
केसांची काळजी - तुम्ही नेहमी हे पाहिलं असेल की, उन्हाळ्यात त्वचेसोबतच केसांचीही हानी होते. केस रखखीत आणि निर्जीव होतात. अशावेळी केसांची काळजी घेताना कोणतीही चूक होता कामा नये. कोणत्याही प्रकारचं केमिकल आणि हेअरस्टाइल करणाऱ्या प्रॉडक्टपासून दूर रहा. शॅम्पूची निवडही योग्यप्रकारे करा. केसांसाठी मुलायम शॅम्पू आणि कंडीशनरचा वापर करा.
पौष्टीक आहार - उन्हाळ्यात त्वचेसोबतच आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे फार गरजेचे आहे. सोबतच हलका आणि पौष्टीक आहार महत्त्वाच आहे. स्कीन हायड्रेट ठेवण्यासाठी ताजी फळं आणि हिरव्या भाज्या खाव्यात. सोबतच काकडी, कारलं, कलिंगड, संत्री, चेरी या फळांचं सेवन करा.