स्मरण शक्ती चांगली ठेवण्यासाठी पुरेशी झोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2016 4:49 PM
पाच तासापेक्षा जे कमी झोप घेतात, त्यांची स्मरणशक्ती ही कमी होत जाते.
निरोगी राहण्यासाठी व्यक्तिला कमीत कमी सहा ते सात तास झोप आवश्यक आहे. पाच तासापेक्षा जे कमी झोप घेतात, त्यांची स्मरणशक्ती ही कमी होत जाते. संशोनातून ही बाब समोर आली आहे. कमी झोपमुळे हिप्पोकॅम्पस व चेतापेशी मध्ये संपर्क होत नाही. त्यामुळे स्मरणशक्ती कमी व्हायला सुरुवात होते असे संशोधनकांचे म्हणणे आहे. त्यासाठी स्मरणशक्ती चांगली ठेवण्यासाठी पुरेशी झोप ही खूप गरजेची आहे. कमी झोपेचा हिप्पोकॅम्समध्ये संयोजन कार्यावरही परिणाम होतो हे सुद्धा यामधून स्पष्ट झाले आहे. संशोधकांनी याकरिता उंदीरांच्या मेंदूवरती ही चाचणी केली. यामध्ये या विविध प्रकारच्या गोष्टी समोर आल्या आहेत. त्याकरिता दररोज पुरेशी झोपही आवश्यक आहे. आण्विक प्रणालीवरही कमी झोपेचा नकारात्मक परिणाम होतो व कॉफिलिनलाही प्रभावित करीत असल्याचे समोर आले.