Smart Tips : पुरुषांनो, काळानुसार स्मार्ट दिसायचे आहे ना? मग असा करा स्वत:मध्ये बदल !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2017 9:27 AM
पुरुषांनीही स्वत:ची काळजी घेऊन स्मार्ट दिसण्याची गरज आहे. अशा काही टिप्स आहेत त्याद्वारे आपण नक्कीच सर्वात उठून दिसाल.
-रवींद्र मोरे आपणही एखाद्या सेलिब्रिटीसारखे स्मार्ट दिसावे असे प्रत्येक पुरुषाला वाटते. मात्र सुंदर दिसणे ही फक्त स्त्रियांचीच गरज आहे, अशी आपली धारणा झालेली आहे. त्यामुळे बहुतांश पुरुष स्त्रियांच्या तुलनेने स्वत:साठी खूपच कमी वेळ देतात. मात्र आता काळ बदलत चालला आहे. पुरुषांनीही स्वत:ची काळजी घेऊन स्मार्ट दिसण्याची गरज आहे. आज आम्ही आपणास अशाच काही टिप्स देत असून त्याद्वारे आपण नक्कीच सर्वात उठून दिसाल.* निस्तेज त्वचेसाठी- स्त्रियांप्रमाणेच काही पुरुषांनादेखील पिंपल्स, डाग, त्वचेची शुष्कता अशा समस्या असू शकतात. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास त्वचा निस्तेज दिसू लागते. या समस्यांचे प्रमाण कमी असल्यास त्या मेकअपने लपवण्याचा प्रयत्न करा. जर चेहरा खूपच खराब दिसत असेल तर काही ब्युटी ट्रीटमेंट्सची मदत घ्या.* हात-पायांची काळजी -बरेच पुरुष स्वत:च्या हात-पायाची काळजी घेत नाही. जसे चेहऱ्याची त्वचा स्वच्छ दिसावी म्हणून आपण प्रयत्न करतो तशी च हात-पायाचीही त्वचाही स्वच्छ दिसावी म्हणून वेळोवेळी पाण्याने धुवावी. शिवाय वाढलेली नखे वेळेवर काढावीत. नखांच्या भोवतालच्या त्वचेचीही स्वच्छता ठेवावी. एखादया कार्यक्रमात जायायचे असेल तर काही दिवस आधी सलूनमध्ये जाऊन किंवा घरीच मेनिक्युर आणि पेडिक्युर अवश्य करा.* पोटावरील अतिरिक्त चरबी- अनेक पुरुषांमध्ये आढळणारी एक समस्या म्हणजे त्यांचे वाढलेले पोट. यामुळे आपल्या सौंदर्यावर नक्कीच गदा येत असते. या समस्येवर नियंत्रण मिळवणे तसे कठीणच आहे. त्यामुळे या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी खाण्यावर ताबा ठेवणे आवश्यक आहे. तसेच नियमित व्यायाम करणे अत्यावश्यक आहे.* डार्क सर्कल्स- खूप वेळ कॉम्युटरसमोर बसून काम करणे, अपुरी झोप, ताण-तणाव, अशा विविध कारणांमुळे डार्क सर्कल्सची समस्या वाढू शकते. यामुळे डार्क सर्कलसोबतच डोळे सुजण्याचीही शक्यता अधिक वाढते. यासाठी काकडी, टोमॅटो अशा काही घरगुती उपायांचा उपयोग करता येईल.* दातांची काळजी-समोरच्या व्यक्तीवर तुमचा प्रभाव पाडण्यासाठी दातांचे सौंदर्य जपणेदेखील आवश्यक आहे. पांढरेशुभ्र दात तुमची स्माईल सुधारण्यासही मदत करतात.Also Read : Beauty Tips : पुरुषांनो, स्मार्ट दिसायचयं? तर वापरा या घरगुती खास टिप्स ! : SMART LOOK : डोक्यावर कमी केस आहेत? तरीही दिसा स्मार्ट !