Smart Tips : ‘या’ कारणांनी पुरुषांना व्हावे लागते लाजिरवाणे, कसे वाचाल?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2017 7:15 AM
असा प्रसंग आपल्यावर येऊ नये म्हणून आम्ही आपल्यासाठी खास टिप्स देत आहोत.
मनुष्याला नेहमी समाजात वावरावे लागते. आपण दिसणे, ऊठणे, बसणे, वागणे, बोलणे आदी बाबींमुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होत असते. मात्र बऱ्याचदा आपले स्वत:ची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष होते आणि आपणावर लाजिरवाणा प्रसंग ओढवला जातो. असा प्रसंग आपल्यावर येऊ नये म्हणून आम्ही आपल्यासाठी खास टिप्स देत आहोत. * शरीरावरील अनावश्यक केसबेसनमध्ये हळद पावडर आणि दही एकत्र करुन स्किनवर लावा. थोड्या वेळाने कोरडे झाल्यानंतर हळुवार घासून साफ करा. यामुळे अनावश्यक केस निघण्यास मदत होईल.* पायांची दुर्गंधीबेसनमध्ये दही एकत्र करुन लावल्यास पायाची दुर्गंधी दूर होते.* डोक्यातील कोंडाबेकिंग सोड्यामध्ये दही एकत्र करुन केसांना लावल्यास कोंडा दूर होण्यास मदत होते. * लठ्ठपणालठ्ठपणा असल्यास रोज कारल्याचा ज्यूस किंवा भोपळ्याचा ज्यूस घेतल्यास याने मेटाबॉलिज्म वाढतो आणि लठ्ठपणा वेगाने कमी होण्यास मदत होते. * डोक्यावरील टक्कलकाळे जिरे आणि मेथीदाण्यांच्या पेस्ट मध्ये नारळ तेल एकत्र करुन लावल्यास या समस्येपासून सुटका मिळू शकते. * पिंपल्सकोरफड(अॅलोवेरा)चे जेल चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्सची समस्या दूर होते.