धूम्रपानाचा परिणाम तुमच्या मुलांवर होतोय!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2016 2:31 PM
धुम्रपान करणाऱ्या पालकांची मुलं अधिक आजार पडतात.
सिगारेट आपल्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहे हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. परंतु आता एका नव्या रिसर्चनुसार धुम्रपान करणाऱ्या पालकांची मुलं अधिक आजार पडतात.याचा अर्थ की, न केवळ सिगारेट ओढणाऱ्यांना तर त्यांच्या मुलांनादेखील सिगारेटचे दूष्परिणाम सहन करावे लागतात. अमेरिकेतील संशोधकांनी नॅशनल सर्वे आॅन चिल्ड्रन्स हेल्थ (2011-12)च्या माहितीचे विश्लेषण करून वरील निष्कर्ष काढण्यात आला.नवजात बालक ते 17 या वयोगटातील मुलांचा यामध्ये अभ्यास करण्यात आला. धुम्रपान करणारे आणि न करणाऱ्या पालकांच्या मुलांच्या आरोग्यात काय फरक आढळतो हा संशोधनाचा हेतू होता.संशोधनात सहभागी एकुण 95677 मुलांपैक 24 टक्के मुलं सिगारेटच्या व्यसन असलेल्या पालकांसोबत राहत होती. संपूर्ण अमेरिकेचा विचार केला असता ही संख्या 1.72 कोटी इतकी होते. सुमारे 5 टक्के मुलांचे पालक घरात सिगारेट ओढायचे.ज्यांचे पालक घरात धुम्रपान करतात, ती मुलं अधिक आजारी पडतात व त्यांना वारंवार वैद्यकीय मदत घ्यावी लागते. एवढेच नाही तर अशा मुलांमध्ये दंतोपचारांचे प्रमाणही फार कमी आढळून आले.पूर्वी झालेल्या विविध संशोधनांतून स्पष्ट झाले आहे की, सिगारेटमुळे मुलांना श्वसनाचे आजार, संसर्गा आणि दम्याचा त्रास उद्भवू शकतो.