सध्या हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेक फळं बाजारात दिसून येतात. त्यातीलच एक म्हणजे द्राक्षं. गोड आंबट चवीची द्राक्षं सगळ्यानाच आवडत असतात. खाण्यासाठी किंवा अनेक पदार्थांमध्ये आपण द्राक्षांचा वापर करतो. पण तुम्हाला माहीत आहे का त्वचेच्या दृष्टीने सुद्धा द्राक्षांचे अनेक फायदे आहेत. द्राक्षांचा वापर अनेक सौंदर्य उत्पादनात केला जातो. चला तर मग जाणून घेऊया त्वचेसाठी कशी फायदेशीर आहेत द्राक्षं.
(image credit- beautybeats)
व्हिटॅमिन आणि खनिज पदार्थ असलेले द्राक्षं त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी बरेच फायदे देखील प्रदान करतात. हानिकारक सूर्यप्रकाशापासून त्वचेचे रक्षण करतात. हे त्वचेच्या पेशींच्या आरोग्याचे रक्षण करतात आणि खराब झालेल्या पेशींच्या दुरुस्तीसाठी पौष्टिक घटक असतात.
द्राक्षामध्ये विटामिन ई असतं जे तुमच्या त्वचेला मॉईस्चराईज ठेवतं आणि तुमच्या त्वचेला डाग आणि पुटकुळ्यांपासून लांब ठेवतं. हवामानात झालेला बदल तसंच बराच वेळ उन्हात राहिल्यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होत असते. जर अशा त्वचेवर तुम्ही केमिक्लसचा वापर न करता द्राक्षांचा फेसपॅक लावल तर त्वचेवरील मृतपेशी निघून झाण्याल मदत होईल, तसचं त्वचेच्या डॅमेज सेल्सना रिपेअर करण्याचे काम द्राक्षाच्या फेसपॅकद्वारे केले जाईल.
(image credit-social dairy)
द्राक्षांचा फेसपॅक आपल्या स्किनवर ग्लो येण्यासाठी फायदेशीर ठरत असतो. जर तुमच्या त्वचेवर कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन असेल तर द्राक्षांच्या फेसपॅक लावण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. हा पॅक तयार करण्यासाठी द्राक्षं बारिक दळून घ्या. त्यानंतर यात गुलाबपाणी घाला. या दोन्ही मिश्रणांना मिक्स केल्यानंतर २० मिनिटं चेहरा आणि मानेला लावून ठेवा त्यानंतर हा पॅक सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर तुम्ही वापरत असलेली कोणतीही क्रिम त्वचेवर लावू शकता. ( हे पण वाचा-महिन्यातून किती वेळा फेशियल करता? त्वचेचं होतय नुकसान,जाणून घ्या कसं)
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्याचा त्रास सगळ्यांनाच होत असतो. जर तुमची त्वचा जास्त कोरडी असेल तर द्राक्षं बारिक करून घ्या आणि त्यात २ थेंब गुलाबपाणी घाला. त्यानंतर मध घाला. हे मिश्रण एकत्र करून साधारणपणे २० मिनिटांपर्यत त्वचेला लावून ठेवा. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. हा प्रयोग केल्यास त्वचा चांगली राहील.
जर तुमची स्कीन ड्राय तर कधी ऑईली होत असेल तर द्राक्षांसोबतच गाजराचे तुकडे किसून घाला. त्यानंतर या मिश्रणात मध घाला. एकत्र झाल्यानंतर हे मिश्रण चेहरा आणि मानेला लावा. नंतर २० मिनिटांना चेहरा धुवून टाका. त्याचबरोबर केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारी द्राक्ष केसांना लावल्यास कोंडा होण्याची समस्या कमी करू शकते. द्राक्षाचा रस केसांना नैसर्गीक चमक देऊन मऊ बनवतो. ( हे पण वाचा-ओठ फाटल्यामुळे लूक बिघडतोय? तर ओठांची काळजी घेण्यासाठी वापरा 'हे' उपाय)