(image credit- simply rediant)
जसजसं वय वाढू लागतं तसतसं शरीरात वेगवेगळे बदल होत जातात. महिलांच्या त्वचेवर या बदलांचा परीणाम लगेच दिसून येत असतो. त्वचा खेचल्यासारखी वाटणे, सूरकुत्या येणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. शरीराच्या अन्य भागांच्या तुलनेत चेहरा जास्त वयस्कर असल्यासारखा दिसायला लागतो. मानेच्या खालच्या भागाला कोलोजन असतात. त्यामुळे त्या ठिकाणची त्वचा ही खूपच पातळ असते. जर तुम्हाला कमी वयात येत असलेल्या सुरकुत्यांपासून बचाव करायचा असेल तर एक्सपर्टसच्या सल्ल्याने तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता.
(image credit-Quara)
सर्वाधिक समस्या या महिला करत असलेल्या केमिकलयुक्त क्रिम्सच्या वापरामुळे उद्भवत असतात. पण घरगुती उपायांचा वापर करून जर तुम्ही त्वेचेची काळजी घेतली तर चेहरा दीर्घकाळ चांगला राहील. अनेक थेरपी आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून सुरकुत्यांपासून सुटका मिळवण्यासाठी उपाय केले जातात. मानेच्या त्वचेच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी फ्रेडेटेट सीओ २ लेजरचा वापर केला जातो.
सुरकुत्यांमुळे मानेची डोळ्यांच्या खालची त्वचा नाजूक आणि पातळ होत असते. यूवी रेजच्या संपर्कात सतत राहिल्यामुळे कोलोजन आणि इलास्टिन फायबरचे कनेक्टिव्ह टिश्यू जे त्वचेच्या आतल्या भागात असतात ते तुटतात. अनेक जेनेटिक आणि पर्यावरणीय घटकांमुळे हे बदल होत असतात. ( हे पण वाचा-बिअर्ड लूकची हौस असेल तर जाणून घ्या दाढी येण्याचं योग्य वय काय?)
(image credit-thomes.loeb)
मानेच्या सुरकुत्यांपासून सुटका मिळवण्यासाठी उपाय
चेहरा साफ करत असताना मानेला साफ करायला विसरू नका. मानेवरचा मळ आणि घाण काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरेल.
साबणाचा वापर मानेची त्वचा स्वच्छ करण्यासाठी करू नका. कारण त्यामुळे पीएच संतुलन बदलण्याची शक्यता असते. साबणाऐवजी क्रिमी क्लीजंरचा वापर करा.
मानेला जास्त वेळ सुर्याच्या किरणांच्या संपर्कात ठेवू नका. जर तुम्ही उन्हात बाहेर पडत असाल तर त्वचेवर सनस्क्रिन लावून मगच घराबाहेर पडा. आठवड्यातून एकदा तरी मानेला डिटॉक्सीफाय करण्यासाठी त्वचेवर वाफघ्या. त्यामुळे तुमची त्वचा फ्रेश राहील.
त्वचेला नेहमी हायड्रेट ठेवा. मानेच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी बोटुलिनम टोक्सिन इंजेक्शंस आणि एस्थेटिक सर्जेरीचा वापर करा.
मानेवर व्हिटामीन सी च्या सिरमचा वापर करा. हे एन्टीऑक्सीडंट्सच्या स्वरूपात काम करत असते. मानेवर मसाज करण्यासाठी एलोवेरा जेलचा वापर करा. ( हे पण वाचा-तरूणींना 'असं' परफ्यूम वापरणारे तरूण आवडतात, तुम्ही सुद्धा 'तेच' वापरता की वेगळं?)