सेलिब्रिटींसारखे सुंदर दिसण्यासाठी खास टिप्स !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 11:01 AM
काही घरगुती उपाय आहेत ज्यांचा परिणाम सौंदर्य खुलविण्यासाठी तर होतो शिवाय ते सौंदर्य चिरकाल टिकण्यास मदत होते. जाणून घेऊया त्या उपायांबाबत...
आज प्रत्येक तरुणीला वाटते की, आपणही सेलिब्रिटींसारखे सुंदर दिसावे, आपले सौंदर्य इतरांपेक्षा वेगळे आणि खुलून दिसावे. त्यासाठी बहुतांश तरुणी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन किंवा घरच्याघरी मेकअपचा आधार घेतात, त्यातच महागड्या सौंदर्य प्रसाधनांना अधिक महत्त्व दिले जाते. मात्र असे म्हटले जाते की, या सौंदर्य प्रसाधनांचा तात्पुरता परिणाम दिसून येतो. असेही काही घरगुती उपाय आहेत ज्यांचा परिणाम सौंदर्य खुलविण्यासाठी तर होतो शिवाय ते सौंदर्य चिरकाल टिकण्यास मदत होते. जाणून घेऊया त्या उपायांबाबत... * काकडीचे गोल काप कापून डोळ्यांवर १५ मिनिटे ठेवावे, त्याने थकलेल्या डोळ्यांना आराम मिळतो. काकडी नसल्यास गुलाबपाण्याच्या पट्टयाही डोळ्यांवर ठेवता येतील. * ब्लिचिंग केल्याने रंग गोरा होत नाही, तर केवळ त्वचेवरील केसांचा रंग फिकट होण्यास मदत होते. गोरं दिसण्यासाठी वारंवार ब्लिचचा वापर करणे शक्यतो टाळावे. * हाताच्या कोपऱ्याचा व गुडघ्याचा काळेपणा दूर करण्यासाठी त्या भागावर ग्लिसरीन लावावे. त्यानंतर कोमट पाण्यात एक जाडसर कपडा भिजवून त्याने रगडावे. असे केल्याने काळेपणा दूर होतो. * काखेतील वाळलेले केस वॅक्सिंग पद्धतीने काढल्यानंतर थोडे टोनर लावावे व बर्फ फिरवून घ्यावा. * चिमट्याने केस पकडून हलक्या झटक्याने ओढून काढण्याच्या क्रियेला प्लकिंग असे म्हटले जाते. केस घट्ट धरून ठेवतील, अशा चांगल्या प्रतीच्या चिमट्यांचा वापर यासाठी करावा. साधारपणे चेहऱ्यावरील केस व भुवयांजवळचे अततिरक्त केस काढून टाकण्यासाठी या क्रियेचा वापर केला जातो. ही पद्धत साधी आणि सुलभ असली तरी कमी प्रणामत असेलले केस काढण्यासाठीच ही पद्धत उपयुक्त ठरते. * नेल ब्लिचचा वापर केल्याने डाग पडलेली नखे आणि त्यांच्या भोवतीची त्वचा मुलायम बनत जाते.