सध्या न्यूड-मेकअप लूकचा ट्रेन्ड असून अनेक बॉलिवूड अभिनेत्री तो फॉलो करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी एका अवॉर्ड फंक्शनमध्ये आलिया भट्टचा रेड कार्पेट लूक इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यावेळी आलियाने न्यूड गाउन वेअर केला होता आणि त्यासोबतच ब्रॉन्ज टचसोबत न्यूड मेकअप लूक अत्यंत सुंदर दिसत होता. फक्त आलियाच नाहीतर दिपीका, सोनम आणि करिना यांसारख्या अनेक बॉलिवूड अभिनेत्री न्यूड मेकअप लूक फॉलो करताना दिसतात. त्यामुळे सध्या न्यूड मेकअप लूक ट्रेन्डमध्ये आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. जर तुम्हालाही असाच न्यूड मेकअप लूक फॉलो करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला काही स्टेप्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही आलियाप्रमाणे न्यूड मेकअप लूक फॉलो करू शकता.
- चेहऱ्यावर हायड्रेटिंग मास्क लावा आणि 15 मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा.
- त्यानंतर चेहऱ्यावर गोल्ड इन्फ्यूज्ड फेस सीरम लावा.
- ओठांवर लिप बाम अप्लाय करा.
- त्वचेवरही फेस प्राइमरचा वापर करा.
- हायलायटरचे काही थेंब घेऊन चेहरा आणि मानेवर लावा.
- आता चेहरा आणि मानेवर हायड्रेटिंग फाउंडेशन लावा.
- हायड्रेटिंग फाउंडेशन चेहऱ्यावर व्यवस्थित लावल्यानंतर कंन्सीलर चेहऱ्यावरील डाग असलेल्या भागांवर लावा.
- आयब्रो पेन्सिलच्या मदतीने आयब्रोजना शेप द्या.
- रोज आणि गोल्ड पावडर हायलायटरच्या मदतीने चीकबोन्स, टेंपल्स, ब्रो बोन आणि नोज ब्रिच हायलाइट करा.
- आता पापण्यांवर मेटॅलिक सिल्वर आयशॅडो लावा.
- अप्पर आणि लोअर आयलॅशेजवर मस्करा लावा.
- ओठांवर लाइट कोरलची लिपस्टिक अप्लाय करा.
- सर्वात शेवटी सेटिंग स्प्रेच्या मदतीने मेकअप सेट करून घ्या.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)