अशी थांबवा केस गळती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2016 4:22 PM
बहुतेक महिला व पुरुषांना केस गळतीची समस्या भेडसावत असते. केस गळतीमुळे हळूहळू टक्कलदेखील पडायला सुरुवात होते.
बहुतेक महिला व पुरुषांना केस गळतीची समस्या भेडसावत असते. केस गळतीमुळे हळूहळू टक्कलदेखील पडायला सुरुवात होते.बऱ्याच उपचारांनतरही फायदा होत नसल्याने आपल्यात न्यूनगंड निर्माण होतो, मात्र केस गळतीच्या समस्येवर आधीच उपाय केल्यास असा प्रसंग ओढवला जाणार नाही. यासाठी काही टिप्स दिल्या असून, यांचा अवलंब केल्यास नक्की केस गळतीच्या समस्येपासून मुक्ती मिळेल. * आपल्या आहारात प्रोटिनयुक्त अन्न जसे दूध, मासे, पनीर असायला हवे. खुराक देखील चांगला असावा. चांगले केस चांगल्या तब्येतीवर सजलेले दिसतात. * आंघोळीनंतर ओल्या केसांना रगडून कोरडे करु नका. केस कोरडे झाल्यानंतर त्यावर कंगवा फिरवा. * केसांच्या मुळाशी रक्तसंचार चांगला होण्यासाठी केसांना तेलाने मसाज करा. मसाज करताना बोटे डोक्याच्या पृष्ठभागावर रगडा, केसांवर नको.* बऱ्याचदा पातळ केस असल्यानेही गळतीचे प्रमाण वाढते. यासाठी मोहरीच्या म्हणजेच सरसोच्या तेलात मेथी गरम करुन लावल्यास अवश्य लाभ होतो. तसेच पातळ केसांवर आॅलिव्ह तेलाचाही वापर करु शकता.* केसांच्या मुळाला कांद्याचा रस लावल्यानेही फायदा होतो. * केसांना रक्तपुरवठा कमी होत असल्याकारणानेही केस गळती होते. यासाठी शीर्षासन केल्याने केसांना रक्तपुरवठा चांगला होतो. * केसांचे टेक्श्चर चांगले होण्यासाठी आणि केसांची चमक वाढविण्यासाठी मुल्तानी माती लावा.* केसांच्या आरोग्यासाठी आवळा आणि शिकाकाई उत्तम आहे. यासाठी आवळा आणि शिकाकाई लोखंडाच्या कढईत भिजत घाला. दोन दिवसांनी ते काढून वाटून घ्या. त्यातील बिया काढून टाका. त्यात दही आणि मेहंदी घाला. ते डोक्याला लावा आणि नंतर चार तासांनी धुवून काढा.* डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी दही लावा.* व्हिटॅमिन ई च्या कमतरतेने केस गळतात. यासाठी व्हिटॅमिन ई गोळ्या घेऊ शकता. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.* अस्वच्छ केस जास्त त्रासदायक असल्याने केसांच्या स्वच्छतेकडे काळजीने लक्ष द्यावे. * घाम जास्त आला तर तो सुकण्याची वाट बघू नका. ओल्या कपड्याने तो पुसून टाका.* गरम पाण्यात टॉवेल भिजवून तो डोक्यावर ठेवा.* केसांमधून सतत हात फिरवू नये.* केसांना नेहमी फणीने विंचरले पाहिजे. * जास्त गरम पाण्याने केस धुवू नये. * डोक्यातील रक्त प्रवाह नियंत्रित होण्यासाठी रोजच्या रोज काही मिनिटांसाठी केसांना मसाज करा. डोक्यातील त्वचेला रक्त प्रवाह सुरळीत झाल्यास केसांची मुळं घट्ट होतात. केसांच्या मसाजसाठी खोबरेल तेलात दोन थेंब लिंबूचा रस टाका आणि एका तासानंतर शॅम्पूनं केस चांगले धुवा.* केसांच्या आरोग्यासाठी घरगुती स्पा देखील करु शकता. यासाठी गरम पाण्यात आॅलिव्हचे तेल काही थेंब घाला आणि त्यात दोन मिनिटांसाठी टॉवेल भिजवून ठेवा. नंतर ह्या टॉवेलनं केसांना झाकून घ्या. हा एक प्रकारचा नैसर्गिक स्पा आहे.* तुम्ही तुमच्या डोक्यातील त्वचेला लसूण, कांदा आणि आलं यांचा रस लावू शकता. हे रात्रभर लावून ठेवा आणि सकाळी केस धुवून टाका.* केसांना मजबूत ठेवण्यासाठी ओले केस विंचरू नये, हे खूपचं उपयुक्त आहे. ओले केस विंचरल्यामुळं जास्त तुटतात. जर बाहेर जायची फारचं घाई असेल तरीही केस थोडे सुकवून नंतर ते विंचरा.