(Image Credit : healthyliving.natureloc.com)
जर तुम्हाला असं वाटत असेल की, दिवसेंदिवस तुमच्या चेहऱ्या रंग सावळा होत आहे किंवा चमकदारपणा निघून गेलाय तर याचं कारण तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी असू शकतात. काही असे पदार्थ आहेत ज्यांमुळे आपल्या चेहरा सावळा होऊ शकतो. किंवा चेहऱ्याचा तजेलदारपणा दूर होऊ शकतो.
साखर
तुम्हाला हे वाचून धक्का बसेल की, साखरेचा जास्त गोडवा तुमचा चेहरा सावळा करु शकतो. कारण साखरेचं अधिक सेवन केल्याने ब्लड शुगर लेव्हल वाढते, ज्यामुळे तुमच्या त्वचेचे टिशूज कोलेजनला नुकसान पोहोचतं. आणि यामुळे चेहऱ्याचा रंग सावळा होऊ लागतो.
व्हाइट ब्रेड
काही लोकांना खाण्यात ब्राउन ब्रेडऐवजी व्हाइट ब्रेड पसंत असतात, पण ब्रेडमुळेही फेअरनेस कमी होऊ शकते हे तुम्हाला माहीत आहे का? व्हाइट ब्रे़डचं सेवन केल्याने इंसुलिनचं प्रमाणा वाढू लागतं. ज्यामुळे तुमच्या त्वचेमध्ये जास्त ऑईल तयार होऊ लागतं. आणि चेहऱ्याचा रंग डार्क होऊ लागतो.
मसालेदार पदार्थ
जास्त प्रमाणात मसालेदार पदार्थ खाल्ल्याने आरोग्यासोबतच त्वचेसाठीही नुकसानकारक ठरतात. सतत मसालेदार पदार्थ खाल्ल्याने शरीराचं तापमान वाढू लागतं. ज्या कारणाने रक्तवाहिन्या पसरु लागतात आणि चेहरा काळवंडतो.
कॉफी
जास्त कॉफी सेवन केल्यानेही आपल्या चेहऱ्याचा रंग सावळा होऊ शकतो. कारण कॉफीमध्ये कॅफीन असतं. ज्यामुळे आपल्या स्ट्रेस हार्मोन कार्टिसोलचं प्रमाण वाढू लागतं आणि याने चेहऱ्याचा रंग हळूहळू सावळा होऊ लागतो.