मेकअप करण्याचे रूल्स आणि स्टेप्स जर आपल्याला माहित असतील तर, तुम्ही परफेक्ट लूक मिळवू शकता. परंतु अनेकदा सर्व स्टेप्स फॉलो केल्यानंतरही आपल्याला बेस्ट रिझल्ट मिळू शकत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे, मेकअप करण्याची चुकीची पद्धत आणि दुसरं कारण म्हणजे, खराब वातावरण होय. खासकरून उन्हाळ्यामध्ये सूर्याच्या प्रखर किरणांमुळे मेकअप खराब होतो. अशातच तुम्ही मेकअप प्रोडक्ट निवडताना काळजी घेणं गरजेचं असतं. जाणून घेऊया प्रोडक्ट निवडताना कोणती काळजी घ्यावी त्याबाबत...
1. फाउंडेशन
फाउंडेशन एक असं प्रोडक्ट आहे, ज्याशिवाय मेकअप अपूर्ण राहतो असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. फाउंडेशनशिवाय मेकअपला व्यवस्थित बेस आणि इव्हन टोन मिळत नाही. अनेक तज्ज्ञांच्या मते, फाउंडेशन मेकअपचा पाया असतो. पण उन्हाळ्यामध्ये हे उन्हाच्या संपर्कात आल्यामुळे वितळतं. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये फाउंडेशनऐवजी फाउंडेशन मिक्स केलेल्या मॉयश्चरायझरचा वापर करा. यामुळे स्किन टोन इव्हन बनते आणि हेव्हीही दिसत नाही.
2. लिपस्टिक
सध्या ग्लॉसी लिपस्टिकचा जमाना नाही, त्याहीपेक्षा मॅट लिपस्टिक ट्रेंडमध्ये आहे. पण उन्हाळ्यामध्ये मॅट लिपस्टिक उन्हाच्या संपर्कात आल्यामुळे पसरते. अशातच लिपस्टिक लावल्यानंतर त्यावर टिंटेड ऑइल लावा. त्यामुळे परफेक्ट लूकसोबतच मॅट लिपस्टिक दिवसभर टिकण्यास मदत होइल.
3. काजळ
जर तुम्हाला दररोज काजळ लावणं आवडत असेल तर खुशाल लावा. पण तुम्ही दररोज जे काजळ वापरता ते उन्हल्यापुरतं तरी दूर ठेवा. त्याऐवजी वॉटरप्रूफ आयलाइनरचा वापर करा. हे उन्हामूळ पसरणार नाही आणि दिवसभर डोळ्यांना परफेक्ट लूक देण्यास मदत करेल.
4. ब्लश
मेकअपमध्ये जास्तीत जास्त लोक पावडर ब्लशचा वापर करतात. उन्हाळ्यामध्ये याची डिमांड आणखी वाढते. याचा वापर करणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पावडर ब्लश चेहऱ्यावर येणारा घाम शोषून घेतं. त्यामुळे मेकअप खराब होत नाही. खरं तर कुशन ब्लशचा वापर करा. त्यामुळे हे त्वचेच्या आतमध्ये जातं आणि मेकअप खराब होत नाही.
5. मस्कारा
उन्हाळ्यामध्ये नॉर्मल मस्करा वापरण्याची चूक अजिबात करू नका. उन्हामुळे हे वितळतं आणि आय लॅशेस एकमेकांवर चिकटतात. वॉटरप्रूफ मस्कऱ्याचा वापर करा. त्यामुळे डोळ्यांना परफेक्ट लूक मिळण्यास मदत होते.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.