उन्हाळ्यामध्ये त्वचेची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. वातावरणातील प्रचंड उकाडा आणि धूळ, माती, प्रदूषणामुळे त्वचेच्या विविध समस्यांचा सामना करावा लागतो. या वातावरणामध्ये सर्वांना टॅनिंगचा सामना करावा लागतो. टॅनिंग त्वचेचा मुख्य रंग डार्क करते आणि यामुळे होणाऱ्या डेड स्किन सेल्स वेळीच काढून टाकल्या नाहीत तर पुढिल काही दिवसांमध्ये त्वचेचा रंग आणखी काळपट दिसू लागतो. यापासून बचाव करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत.
1. हायड्राफेशियल
पाणी आपल्या त्वचेला शरीराच्या आतून हायड्रेट करण्याचा प्रयत्न करतं. परंतु उन्हाळ्यामध्ये फक्त पाण्याच्या मदतीने तुम्ही त्वचा हेल्दी ठेवू शकत नाही. उन्हाची प्रखर किरणं जेव्हा त्वचेवर पडतात. त्यावेळी त्वचेला अत्यंत नुकसान पोहोचवतात. या सर्वांपासून सुटका करण्यासाठी हायड्रोफेशिअल करणं फायदेशीर ठरतं. सध्या अनेक महिला हायड्रोफेशिअल करत असून याचे चांगले परिणामही दिसून येत आहेत.
2. पीलिंग
सूर्याच्या प्रखर किरणांमुळे टॅनिंगच नाही तर इतरही समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे त्वचेचा नैसर्गिक रंग जाऊन त्वचा काळवंडते. तसेच त्वचेवर मोठ्या प्रमाणावर डेड स्किन सेल्स जमा होतात. त्वचेच्या या मृत पेशी हटवणं अत्यंत गरजेचं असतं. त्यासाठी पीलिंग मदत करतं. पीलिंग डेड स्किन सेल्स दूर करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे त्वचा सॉफ्ट, स्मूथ स्किन मिळण्यास मदत होते.
3. क्लींजिंग, टोनिंग
उन्हाळ्यामध्ये दररोज दिवसातून कमीत कमी एकदा तरी चेहरा क्लीजिंग आणि टोनिंग करणं गरजेचं आहे. यामुळे वेळोवेळी चेहऱ्यावरील मृत पेशी काढून टाकण्याचं काम करतात. घरातून बाहेर निघण्यापूर्वी आणि घरी परतल्यानंतर क्लींजिंग नक्की करा.
4. व्हिटॅमिन-सी
उन्हाळ्यामध्ये जर यंग अॅन्ड ब्युटीफुल स्किन पाहिजे असेल तर व्हिटॅमिन-सीचा वापर करा. आता तुम्ही म्हणालं की, त्यासाठी काय करावं लागेल? तर आहारामध्ये व्हिटॅमिन-सी युक्त पदार्थांचा समावेश करा. तसेच तुम्ही त्वचेसाठी जी कोणती क्रिम किंवा मॉयश्चरायझर वापर असाल त्यामध्येही व्हिटॅमिन-सी असेल याची खात्री करून घ्या.
5. भरपूर पाणी प्या
पाणी, सरबत, ज्यूस यांसारख्या पेय पदार्थांचा थोड्या थोड्या वेळाने सेवन करा. यामुळे त्वचा आतून हायड्रेट राहण्यासोबतच निरोगी राहण्यासही मदत होते. तुमचं शरीर आतून जेवढं हायड्रेट राहिल तेवढी तुमची स्किन ग्लो होईल.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.