(Image Credit : QuirkyByte)
उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणं हा फार मोठा टास्क असतो. उन्हाळा सुरू झाला की, ऑयली स्किन असणाऱ्यांच्या चिंता वाढू लागतात. उन्हामध्ये गेलं की, लगेचच त्यांचा चेहरा तेलकट होतो. पण उन्हाळा फक्त ऑयली स्किन असणाऱ्यांसाठीच त्रासदायक ठरत नाही तर कोणत्याही प्रकाची स्किन असणाऱ्यांसाठी तो त्रासदायकच ठरतो. उन्हाळ्यामध्ये ड्राय, कॉम्बिनेशन आणि सेन्सिटिव्ह स्किन सर्वांसाठी त्रासदायक ठरतं. अशातच तुम्ही जर होममेड फेस पॅकचा आधार घेणं गरजेचं ठरतं. जे त्वचेमध्ये जाऊन आपली त्वचा ठिक करण्यासाठी सॉफ्ट, मुलायम आणि टॅन-फ्री त्वचेसाठी मदत करतात.
उन्हाळ्यामध्ये ऑयली स्किनसाठी फेस पॅक (Face pack for oily skin in summers):
1. हळद, तांदळाचा फेस पॅक
एका छोट्या बाउलमध्ये 3 चमचे तांदळाचं पीठ एकत्र करा. यामध्ये एक चिमुटभर हळद, एक चमचा मध आणि थोडासा काकडीचा रस एकत्र करा. सर्व पदार्थांना एकत्र करण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर करा. तयार फेस पॅक चेहऱ्यासोबतच शरीराच्या इतर भागांवरही लावू शकता.
2. बदाम आणि मधाचा फेस पॅक
10 बदम रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा. सकाळी त्यांची साल काढून मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्या. पेस्ट तयार झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मध एकत्र करा. फेस फॅक तयार होईल. उन्हाळ्यामध्ये ड्राय स्किनसाठी फेस पॅक (Face pack for dry skin in summers):
1. पपई फेस पॅक
उन्हाळ्यामध्ये ड्राय स्किन असणाऱ्यांना काही प्रमाणात आराम मिळतो. पण हा स्किन टाइप असणाऱ्यांची त्वचा निस्तेज दिसते. त्वचा ग्लोइंग करण्यासाठी थोडी पपई मिक्सरमध्ये ब्लेंड करा. तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा.
2.योगर्स फेस पॅक
उन्हाळ्यामध्ये ड्राय स्किनला सॉफ्ट आणि स्मूथ करण्यासाठी त्यामध्ये 2 चमचे योगर्टमध्ये 1 चमचा मध एकत्र करून चेहऱ्यावर लावा. दोन्ही पदार्थांमधील गुणधर्म त्वचेचं आरोग्य राखण्यासोबतच सौंदर्य वाढविण्यासाठी मदत करतात.
उन्हाळ्यामध्ये कॉम्बिनेशन स्किनसाठी फेस पॅक (Face pack for combination skin in summers):
1. मध, योगर्स, गुलाब पाणी फेस पॅक
तिन्ही गोष्टींना समप्रमाणात (एक-एक चमचा) एका बाउलमध्ये एकत्र करून घ्या. तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्यानंतर 15 मिनिटांसाठी तसचं ठेवा आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
2. पपई आणि केळी फेस पॅक
कॉम्बिनेशन स्किन उन्हाळ्यामध्ये ऑयली असण्यासोबतच ड्रायही होते. अशा स्किनवर उपाय म्हणून थोडी पपई आणि केळी एकत्र करून व्यवस्थित स्मॅश करा. आता यामध्ये एक चमचा मध एकत्र करून तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा.
उन्हाळ्यामध्ये सेन्सिटिव्ह स्किनसाठी फेस पॅक (Face pack for oily skin in summers):
1. केळ्यापासून तयार केलेला फेस पॅक
सेन्सिटिव्ह स्किनल नॉर्मल करण्यासाठी एक केळं बाउलमध्ये स्मॅश करून घ्या. त्यानंतर तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा.
2. मध फेस पॅक
जर उन्हाळ्यामध्ये त्वचा फार सेन्सिटिव्ह झाली असेल आणि उन्हामध्ये गेल्यावर लगेच जळजळ होत असेल तर त्यावर मद फायदेशीर ठरतं. मध घेऊन त्वचेवर थेट लावा. दिवसातून असं एक ते दोनवेळा केल्याने त्वचा ठिक होते.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.