सध्यातरी उन्हाळा पूर्णपणे सुरू झाला असे म्हणता येणार नाही. पण उन्हाचा पारा दिवसा वाढलेला असतो. अशात उन्हाळ्यात त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. खासकरून तेलकट त्वचा असलेल्यांनी उन्हाळ्यात विशेष काळजी घ्यावी लागते. घामामुळे ही समस्या आणखीनच वाढते. त्यामुळे खासकरून तेलकट त्वचेची उन्हाळ्यात जरा अधिक काळजी घ्यावी लागते. पण अनेकजण काळजी घ्यायची म्हणून नको नको ते उपाय करतात. मग त्याचे चांगले परिणाम दिसण्याऐवजी वाईट परिणाम दिसतात. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्हाला उन्हाळ्यात तेलकट त्वचेची काळजी घेणे सोपे जाईल.
कोमट पाण्याने चेहरा धुवा
तेलकट त्वचा धुण्यासाठी थंड पाण्यापेक्षा कोमट पाणी अधिक चांगलं मानलं जातं. कारण या पाण्याने धूळ आणि प्रदूषण चांगल्याप्रकारे त्वचेवरून स्वच्छ केलं जाऊ शकतं.
पुन्हा पुन्हा चेहरा धुवू नका
चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसातून दोन वेळा धुवावा. दोनपेक्षा जास्त वेळा चेहरा धुवू नका. असे केल्याने त्वचा रफ होते आणि ती ठिक करण्यासाठी तुमचे ग्लॅंड्स आणखी जास्त आइल रिलीज करतात.
कमी मेकअप
उन्हाळ्यात जितकं हलकं मेकअप करू शकाल तितकं चागलं. हेवी फाउंडेशन लावणे टाळा आणि मॉइश्चरायजरचा सुद्धा वापर कमी करावा.
बनाना हनी फेसपॅक
जर तुम्ही आयली स्कीनसाठी वेगवेगळे ब्युटी प्रॉडक्ट्स वापरून थकले असाल तर काही घरगुती उपाय ट्राय करू शकता. केळी आणि मधाचा फेसपॅक तुम्ही ट्राय करू शकता. यासाठी एक केळी आणि एक चमचा मध घ्या. याची चांगली मुलायम पेस्ट तयार करा. त्यात थोडा लिंबाचा रस मिश्रित करा. त्यानंतर हा फेसपॅक २० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. नंतर चेहरा पाण्याने धुवा.
अॅपल हनी फेसपॅक
हा फेसपॅक ऑयली स्कीनसाठी परफेक्ट फेस मास्क आहे. मधामुळे स्कीनला सॉफ्ट टेक्स्चर मिळण्यास मदत होते. तर सफरचंदामुळे स्कीनला आवश्यक पोषक तत्त्व मिळतात.