(Image Credit : ultrabee.co.za)
उन्हामध्ये असणारं व्हिटॅमिन-डी शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतं. पण प्रखर ऊन शरीरासाठी घातकही ठरू शकतं. उन्हाळ्यामधील दुपारचं ऊन त्वचेला फार नुकसान पोहोचवतं. अनेक त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, सतत आणि थेट उन्हाच्या संपर्कात आल्यामुळे त्वचेच्या इतर समस्यांसोबतच त्वचेचा कॅन्सर होण्याचाही धोका असतो. पण यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. दे हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, काही उपायांचा वापर करून त्वचेची काळजी घेतली तर त्वचेच्या इतर समस्यांसोबतच यांसारख्या गंभीर समस्यांपासूनही त्वचेचं रक्षण करणं सहज शक्य होतं.
अल्ट्रावॉयलेट किरणांपासून दूर रहा
त्वचेचा कॅन्सर, इतर कॅन्सरच्या प्रकारांपैकी एक आहे. सूर्याच्या अल्ट्रावॉयलेट किरणांचा त्वचेवर होणारा प्रभाव, त्वचेचा कॅन्सर होण्याचं एक प्रमुख कारण आहे. त्वचेच्या कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक असतं. त्वचेचा कॅन्सर फक्त त्वचेपुरताच मर्यादित राहत नाही तर ऑक्युलर स्किन कॅन्सर नावाच्या आजाराची सुरुवात डोळ्यांपासूनच होते. हा देखील कॅन्सरचाच एक प्रकार आहे. यापासून बचाव करण्यासाठी तुम्हाला सूर्याच्या प्रखर किरणांपासून डोळ्यांचं रक्षण करणं गरजेचं असतं. त्यामुळे उन्हामध्ये जाताना सनग्लासेसचा वापर करणं विसरू नका.
काय म्हणतं संशोधन?
एका संशोधनानुसार कॉफीचं सेवन केल्याने त्वचेच्या कॅन्सरपासून रक्षण होतं. संशोधकांनी सांगितल्यानुसार, दररोज एक कप कॉफीचं सेवन कॅन्सर होण्यापासून रोखतं. जरी तुम्ही एसपीएफयुक्त सनस्क्रिन लोशन किंवा क्रीमचा वापर करत असाल तर एवढचं पुरेसं नसतं. तुम्हाला तुमची त्वचा सूर्याच्या किरणांपासून दूर ठेवणं गरजेचं असतं. त्यासाठी योग्य कपड्यांची निवड करणंदेखील गरजेचं असतं.
दुपारचं ऊन ठरतं घातक
दुपारच्यावेळी सूर्याची यूव्ही किरणं सर्वाधिक घातक असतात. जर तुम्ही दुपारच्यावेळी घरातून बाहेर पडणार असाल तर त्वचेची आवश्यक ती काळजी घ्या.
सवळा रंग फायदेशीर
सावळा रंगाच्या त्वचेच्या व्यक्तींमध्ये कॅन्सरची लक्षणं सहजासहजी आढळून येत नाहीत. परंतु गोऱ्या त्वचेच्यालोकांना कॅन्सरचा धोका अधिक असतो. जर तुमचा रंग अत्याधिक गोरा असेल तर तुम्हाला तुमच्या त्वचेची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.