उन्हाळ्यामध्ये निरोगी आणि सुंदर चेहऱ्यासाठी आपण अनेक उपाय करतो. त्यासाठी बाजारात मिळणाऱ्या अनेक उत्पादनांचा वापर करण्यात येतो, जी सन टॅन दूर करण्यासाठी मदत करतात. पण या उत्पादनांमध्ये केमिकल्सचा वापर करण्यात आलेला असतो. यामुळे अनेकदा साइड इफेक्ट्सचा सामना करण्यात येतो. अशातच उन्हाळ्यामध्ये अनेकदा प्रखर उन्हामुळे त्वचेला सन टॅनिंगचा सामना करावा लागतो. जास्तीत जास्त महिला सन टॅनिंग, कोरडी आणि निस्तेज त्वचा यांसारख्या समस्यांनी त्रस्त असतात. त्वचेच्या या सर्व समस्या लपवण्यासाठी त्या मेकअप करतात. परंतु फारसा फरक जाणवत नाही. जास्त मेकअप करणंही उन्हाळ्यामध्ये ठिक नाही. हेल्दी आणि ग्लोइंग स्किनसाठी नैसर्गिक आणि घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. उन्हाळ्यामध्ये गरम हवेमुळे त्वचा कोरडी झाली असेल किंवा काळवंडली असेल तर घरच्या घरी तुम्ही हे तीन फेस पॅक तयार करून वापरू शकता.
उन्हाळ्यामध्ये त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो...
उन्हाळ्याच्या सीझनमध्ये कितीही सनस्क्रिन लावा किवा कितीही चेहरा कव्हर करून घराबाहेर पडा, ड्राय स्किनच्या समस्येचा सामना करावा लागतो. एवडचं नाही तर सूर्याच्या प्रखर किरणांमुळे सन टॅनिंगच्या समस्येचाही सामना करावा लागतो. टॅनिंगमुळे चेहऱ्याचा रंग काळवंडतो. ज्यासाठी तुम्ही काही घरगुती फेसपॅक वापरू शकता.
उन्हाळ्यामध्ये सनटॅनिंगसाठी फेसपॅक्स :
- हळद आणि बेसनाचा फेसपॅक
- 2 मोठे चमचे बेसन
- चिमूटभर हळद
- 1 चमचा गुलाब पाणी
- 1 मोठा चमचा दूध
तयार करण्याची पद्धत :
वरील सर्व पदार्थ एकत्र करून घ्या. या पॅक त्वचेवर लावून 20 मिनिटांसाठी तसचं ठेवा. पॅक सुकल्यानंतर थोड्याशा पाण्याने ओला करून स्क्रब करत चेहऱ्यावरून काढून टाका.
कोरफड, मसूर डाळ आणि टोमॅटो पॅक
- 1 चमचा लाल मसून डाळ पावडर
- 1 चमचा टोमॅटोचा रस
- 1 चमचा कोरफडीचा रस
तयार करण्याची पद्धत :
मसूर डाळीला टोमॅटोचा रस आणि कोरफडीसोबत एकत्र करून एक घट्ट पेस्ट तयार करा. तयार पॅक चेहऱ्यावर लावा आणि अर्धा तासासाठी तसचं ठेवा. त्यानंतर हे थंड पाण्याने धुवून टाका. बेस्ट रिझल्टसाठी आठवड्यातून दोन वेळा लावा.
लिंबाचा रस, काकडी आणि गुलाब पाणी
- 1 मोठा चमचा लिंबाचा रस
- 1 मोठा चमचा काकडीचा रस
- 1 मोठा चमचा गुलाब पाणी
तयार करण्याची पद्धत :
वरील सरव साहित्य व्यवस्थित एकत्र करून टॅनिग झालेल्या त्वचेवर लावून 12 मिनिटांसाठी तसचं ठेवा आणि त्यानंतर धुवून टाका. असं दररोज करा.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.