रजनीकांतच्या पत्नीला सुप्रीम कोर्टाची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2016 1:54 PM
कोचाडियन या अॅनिमेटेड तामिळ चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शन टीमची फसवणूक केल्याचा आरोपावरुन दाक्षिणात्य चित्रपटांचा सुपरस्टार रजनीकांत यांच्या पती लता यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली आहे.
कोचाडियन या अॅनिमेटेड तामिळ चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शन टीमची फसवणूक केल्याचा आरोपावरुन दाक्षिणात्य चित्रपटांचा सुपरस्टार रजनीकांत यांच्या पती लता यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली आहे. ‘कोचाडियन’ चित्रपटाच्या विक्री हक्क प्रकरणी एका जाहिरात कंपनीच्या याचिकेनंतर ही नोटीस पाठवण्यात आली आहे. कोर्टात खोटी कागदपत्रं सादर केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. कोचाडियन चित्रपटासाठी आपल्या फर्मने १४.९ कोटी रुपयांचं पोस्ट प्रॉडक्शनचं काम केल्याचा दावा तक्रारकर्त्याने केला आहे. लता यांनी करारावर स्वाक्षरी करुन संपूर्ण रक्कम देण्याची हमी दिली होती. मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्यापैकी फक्त ८.७ कोटी रुपये लता यांनी चुकते केले असून उर्वरित ६.२ कोटी रुपये भरले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.हळसुरु गेट पोलिस स्थानकात कलम १९६ (खोटी कागदपत्रं सादर करणे), १९९ (खोटं प्रतिज्ञापत्र सादर करणं) ४२० (फसवणूक) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.