शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
4
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
5
ऐश्वर्या रायबाबत नणंदेचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
6
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
7
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
8
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
9
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
10
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
11
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
12
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
13
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
14
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
15
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
16
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
17
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
18
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
19
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
20
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?

​नात्यातील ऋणानुबंध टिकविताना!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2016 12:29 PM

हसणे आणि हसविणे प्रत्येकाच्या आरोग्यासाठी चांगली गोष्ट आहे...

-रवींद्र मोरे हसणे आणि हसविणे प्रत्येकाच्या आरोग्यासाठी चांगली गोष्ट आहे. जोडीदाराबरोबरचे सुंंदर नाते वषार्नुवर्षे टिकण्यामागचे रहस्यदेखील खळखळून हसणे आणि हसविणेच आहे. संशोधकांच्या मतानुसार रोमॅँटिक नात्याची जवळीकता कायम ठेवण्यासाठी आयुष्यातील आनंददायी क्षणच कारणीभूत असतात. यासाठी दोघांचाही सहभाग महत्त्वाचा असतो.  नात्याचे ऋणानुबंध टिकविताना एकमेकांनी कोणती काळजी घ्यायला हवी, याची माहिती या ठिकाणी देत आहोत.बहुतेक चित्रपट मग ते हॉलिवूड असो की बॉलिवूड, त्यामधील कथानक हे नात्यावरच आधारलेले असते.  त्यात नात्यांची गुंफण ही सुंदररित्या मांडलेली असते. केवळ चित्रपटातच नव्हे तर रियल लाइफमध्येही बरीच नाती ही सर्वांसाठी आदर्श ठरतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मिशेल आणि बराक ओबामा यांचे बºयाच वषार्पासूनचे टिकलेले हॅपी मॅरिड लाइफ. मिशेलचे म्हणणे आहे की, आनंदी व रोमॅँटिक क्षणांनी आमचे आयुष्य खूपच सुंदर झाले आहे. आम्ही घरात नेहमी हसत-खेळतच राहतो. कधीही गंभीर किंवा दु:खी होत नाही. आम्ही एकमेकांचे मनोरंजन करण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधतो. आम्ही एकमेकांना नेहमी हसवतो आणि यातच ओबामा रोमॅँटिक होतात. इतकेच नव्हे तर वाढदिवसाची तारीखही ते विसरत नाहीत. महिला वर्गाची नेहमी एक मोठी नाराजी असते, ती म्हणजे पुरुषवर्ग अशा महत्त्वाच्या तारखा विसरतात. याच कारणाने बºयाच जोडप्यांंमध्ये वादही होतात. आपल्या नात्यात एकमेकांना समजण्याची क्षमता असेल आणि ‘लाफ्टर’वाली मेडिसिन असेल तर ही समस्या तत्काळ दूर होईल व आपल्या नात्यातील गोडवा टिकून राहील. सकारात्मक भावनिक वातावरण हसण्यामुळे दोघांमध्ये सकारात्मक, भावनिक वातावरण तयार होते. एवढेच नव्हे तर, नातेसंबंध दृढ होतात. एखाद्याला कोणाचा तरी सहवास अधिक पसंत असेल, तर त्याचे कारण म्हणजे त्याचा लाभलेला सहवास हा हास्य आणि मौजमस्तीची संधी देणारा असू शकतो. हेच अनुभव नात्यातील जवळीकता वाढवितात. संशोधकांच्या मते, आपल्या उपस्थितीत मनमोकळपणे हसणाºया महिलांना पुरुष अधिक पसंत करतात.   जोडीदारांचे आठवणीतले क्षण बरेच जोडीदार फक्त चित्रपट किंवा टीव्ही पाहूनच हसतात. मात्र त्यांनी व्यक्तिगत आयुष्यातील घडामोडींबाबतही मनमोकळेपणाने हसायला हवे. यामुळे वेगळ्या पद्धतीची जवळीकता निर्माण होत असते. विशेष म्हणजे वषानुवर्षे हेआठवणीतले क्षण विसरले जात नाहीत. ते आपल्या ह्रदयाच्या एका कप्प्यात साठवून ठेवले जातात. या क्षणांची आठवण करुन मनाला एक आगळावेगळा आनंद मिळतो. नेहमी हसतमुख रहा नेहमी सोबत राहणारी जोडपी कायम हसतखेळत आनंदी जीवन जगतात, हे आपणास माहिती आहे.  संशोधकांच्या मते, सेंस आॅफ ह्यूमर असणारे पुरूष प्रत्येक सोसायटीतील महिलांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनतात. हाच ह्युमर नात्याला नेहमी फ्रेश ठेवतो.  यामुळे नाते अजून अधिक मजबूत होते. लहानमोठ्या समस्यांमध्येही सेंस आॅफ टुगेदरनेस मजबूत असते. हसणे आणि सकारात्मक भावनिक आठवणी तणावाला चारहात लांब ठेवतात. शास्त्रीयदृष्ट्या स्ट्रेस हॉर्माेन्सवर हसण्याचा निगेटिव्ह परिणाम होतो आणि फिल गुड हॉर्मोन्सची निर्मिती होते. नात्यातील कटूता संपवा आज प्रत्येकजण व्यस्त झाला आहे. एकमेकांसाठी पुरेसा वेळ नाही, त्यामुळे नात्यात दुरावा तर येतोच पण याच दुराव्यामुळे पुढे कटुता येते. व्यस्त जीवनशैलीमध्येही स्वत: हसणे आणि आपल्या जोडीदारालाही हसविण्याची कारणे शोधणे अत्यंत आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, जोडीदारावर हसण्यापेक्षा स्वत:च्या चुकांवर हसणे ही देखील चांगली कल्पना आहे. स्वत:ला नेहमी हसतखेळत ठेवण्यासाठी एकमेकांसोबत काही खेळ खेळा. आपल्या जोडीदाराला कोणकोणत्या गोष्टींमुळे हसायला येते हे माहिती असू द्या. आपण जरी मोठे झालो, तरी एकमेकांसोबत बसून कार्टून चित्रपट पाहत आनंद घेऊ शकता. विश्वास ठेवा, असे चित्रपट पाहिल्याने सर्व ताण विसरला जातो. जेवण करतानाही गंभीर विषयांवर चर्चा करु नका. याठिकाणीही सर्वांनी हसमुख राहिल्याने वातावरणात एक सकारात्मक बदल होऊन जेवणावर त्याचा नकारात्मक परिणाम जाणवत नाही.