Ayurvedic manjan recipe : सगळ्यांनाच चमकदार आणि मजबूत दात हवे असतात. त्यासाठी लोक वेगवेगळे उपायही करतात. पण आजकाल लोकांच्या चुकीच्या सवयींमुळे दात पिवळे होतात. ज्यामुळे चारचौघात मोकळेपणाने हसूही शकत नाहीत. पिवळे दात पांढरे करण्यासाठी लोक वेगवेगळे उपायही करतात. पण यांचा सगळ्यांनाच फायदा मिळतो असं नाही. अशात आज आम्ही तुम्हाला पिवळे दात चमकदार करण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत. ज्याद्वारे तुमचे दात चमकदार होतील. चारपैकी एक उपाय तुम्ही महिनाभर केला तर पिवळ्या दातांची समस्या दूर होईल. चला जाणून घेऊ काय आहेत हे उपाय...
आयुर्वेदिक मंजन कसं कराल तयार?
जांभळाचं पावडर
हे तयार करण्यासाठी जांभळाच्या सालीचं पावडर तयार करा. यात थोडं सैंधव मीठ आणि काळी मिरे मिक्स करा. हे मिश्रण एका डब्यात स्टोर करा. रोज या चुर्णाने ब्रश करा. दात मजबूत तर होतीलच सोबतच पिवळेपणाही दूर होईल.
डाळिंबाचे फूल
डाळिंबाच्या फुलाचं तुम्ही चूर्ण तयार करा. हे चूर्ण एका काचेच्या बॉटलमध्ये स्टोर करा. रोज या मंजनाने दात साफ करा. याने दातांचा पिवळेपणा दूर होईल.
बदामाची साल
बदामाच्या सालीचे अनेक फायदे असतात. यापासून तुम्ही दातांसाठी मंजन तयार करू शकता. बदामाची साल जाळून त्यापासून मंजन तयार करा. यात थोडं सैंधव मीठ टाका आणि रोज या मंजनाने दात स्वच्छ करा.
लिंबू आणि तेल
लिंबाच्या रसात थोडं तेल टाका आणि त्यात थोडं मीठ मिक्स करा. या मिश्रणाने दात स्वच्छ करा. याने दात मजबूतही होतात आणि दातांचा पिवळेपणाही दूर होईल.