आपल्या स्कीनचं सौंदर्य वाढविण्यासाठी आणि ग्लो वाढविण्यासाठी अनेक उपाय आपण करतो. ब्युटी एक्सपर्टचा सल्ला घेण्यापासून ते बाजारातील वेगवेगळे प्रोडक्टस वापरण्यापर्यंत अनेक गोष्टी आपण करतो. पण जर काही घरगुती उपायांचा स्कीन टोन करण्यासाठी किंवा स्कीनवरील ग्लो कायम ठेवण्यासाठी वापर केला तर फायदेशीर ठरतं. जाणून घेऊयात काही नॅचरल टोनर्सबाबत जे स्कीनला नॅचरली टोन करण्यासाठी मदत करतील.
लिंबू
लिंबू एक फायदेशीर स्कीन टोनर आहे. लिंबामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात आढळून येतं. लिंबू फक्त आरोग्य चांगलं राखण्यासाठीच नाही तर स्कीनसाठीही लाभदायक ठरतं. स्कीनवरील टॅनिंग दूर करण्यासाठी किंवा केसांना चमकदार बनवण्यासाठी लिंबाचा वापर होतोच. पण याशिवाय ऑयली स्कीनसाठीही लिंबाचा वापर करण्यात येतो. लिंबामध्ये असलेलं सॅट्रीक अॅसिड स्कीनवरील टॅनिंग दूर करून स्कीन उजळवण्यास फायदेशीर ठरतं. त्याचबरोबर हे चेहरा किंवा शरीरावरील कोणत्याही भागातील डाग किंवा व्रण दूर करण्यासाठी मदत करतं.
पुदीना
तुम्हाला विश्वास बसणार नाही पण पुदीना स्कीनसाठी नॅच्युरल टोनर म्हणून काम करतं. पुदीन्यामध्ये मेन्थॉल आणि अॅन्टी-बॅक्टेरिअल प्रॉपर्टीज असतात. पुदीना ऑयली स्कीनसाठी फार फयदेशीर ठरतो.
कापूर
आजीच्या बटव्यामध्ये कापूर फार पूर्वीपासूनच समाविष्ठ आहे. कापूराचा स्कीन आणि केसांच्या समस्यांवर उपाय म्हणून वापर करण्यात येतो. तसेच स्कीन लाइट करण्यासाठीही कापूर वापरण्यात येतो. तसेच स्कीन इन्फेक्शन, रेडनेस, अॅलर्जी यांवरही कापूर गुणकारी ठरतो.
टॉमेटो
नॅच्युरल स्कीन टोनर म्हणून टॉमेटोचा वापर करण्यात येतो. यामध्ये सॅट्रिक अॅसिड मोठ्या प्रमाणात असते. यामुळे स्कीन उजळण्यास मदत होते. तसेच स्कीन टाइट करण्यासाठीही टॉमेटो वापरण्यात येते.
फिटकरी आणि ग्लिसरीन
स्किनसाठी फिटकरी फार उपयोगी आहे. स्कीन लाइट करण्यासाठी फिटकरी फायदेशीर ठरते. फिटकरी ग्लिसरीनसोबत मिळून लावली तर नॅच्युरल स्कीन टोनर म्हणून काम करते.