नियमितपणे मेनिक्योर करण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे हातांचं सौंदर्य वाढण्यासोबतच नखांचं आरोग्य राखण्यासही मदत होते. यामुळे नखांना इन्फेक्शन होण्याचा धोका राहत नाही. त्याचबरोबर आपली बॉडी नवीन सेल्स प्रोड्यूस करते आणि नखं मजबूत होण्यास मदत होते. मनेक्योरमध्ये अनेक प्रकार आढळून येतात. परंतु हॉट ऑइल मेनिक्योर सध्या ट्रेन्डमध्ये आहे. हे ब्लड सर्क्युलेशन वाढण्यासोबतच जॉइन्टसाठीही फायदेशीर असतं. जाणून घेऊया हॉट ऑिल मेनिक्योर करणं का आवश्यक आहे त्याबाबत...
काय आहे हॉट ऑइल मेनिक्योर?
हॉट ऑइल मेनिक्योर इतर मेनिक्योरपेक्षा थोडंसं महाग आहे. कारण यामध्ये अनेक नरेशिंग आणि ऑर्गॅनिक पदार्थांचा वापर करण्यात येतो. तुम्ही हे पार्लरऐवजी घरीही ट्राय करू शकता.
घरीच करा हॉट ऑइल मेनिक्योर
हॉट ऑइल मेनिक्योर घरीच करण्यासाठी तुम्हाला सनफ्लॉवर ऑइल, कॅस्टर ऑइल, बदामाचं तेल, व्हिटॅमिन ई ऑइल, टी ट्री ऑइल, ऑलिव ऑइल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल्सची गरज असते. सर्व ऑइल्स एका बाटलीमध्ये एकत्र करून 30 सेकंदांसाठी गरम करा. आता यामध्ये कॅप्सुल तोडून एकत्र करा. आपल्या हाताची बोटं यामध्ये बुडवून ठेवा. जोपर्यंत तेल थंड होत नाही तोपर्यंत तसचं ठेवा. थंड झाल्यानंतर तेल पुन्हा गरम करा आणि आपल्या हातांना आणि मनगटाला मसाज करा. तेल व्यवस्थित अब्जॉर्ब झाल्यानंतर हात धुवून टाका आणि कोरडे झाल्यानंतर यावर मॉयश्चरायझर अप्लाय करा. हे मेनिक्योर आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा करा. नियमितपणे वापर केल्याने तुम्हाला फरक जाणवेल.
हॉट ऑइल मेनिक्योरचे फायदे :
हॉट ऑइल मेनिक्योरचे अनेक फायदे आहेत. पहिलं म्हणजे हे हातांवर दिसून येणारी वाढत्या वयाची लक्षणं दूर करण्यासाठी मदत करतं. मसाज केल्याने ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि त्वचेसाठीही फायदेशीर ठरतं. हे मेनिक्योर नखांना एक्सफॉलिएट करण्यासाठी मदत करतं, तसेच यामुळे नखांना क्लिन लूक मिळण्यासाठी मदत मिळते. ज्या व्यक्ती कम्प्युटरवर पूर्ण दिवस काम करतात, त्यांच्यासाठी हॉट ऑइल मेनिक्योर अत्यंत उपयोगी ठरतं.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.