आॅफिसमधील ‘एसी’चे हे आहेत दूष्परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2016 4:12 PM
दीर्घकाळ अशा कृत्रिम थंडीत राहणे आपल्या शरीरासाठी चांगले नाही.
आजकाल बहुतांश आॅफिसेस वातानुकूलित असतात. खासगी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे कार्यालयाचे स्वरुप अधिक मॉडर्न झाले. मॉडर्न म्हणजे वातानुकूलित (एसी). बाहेर कितीही कडक उन्हाळा असू द्या, आॅफिसमध्ये मात्र नेहमीच हुडहुडी भरवणारे थंड वातावरण असते. आता बऱ्याच जणांना हे चांगले वाटत असले तरी दीर्घकाळ अशा कृत्रिम थंडीत राहणे आपल्या शरीरासाठी चांगले नाही. आॅफिसच्या तीव्र एसीमुळे कर्मचाऱ्यांवर पुढील समस्यांना सामोरे जावे लागते.१. डोळे व त्वचेचा कोरडेपणाएसी हवेतील आर्द्रता शोषून घेतो. आपल्या त्वचेसाठी गरजेचा पोषक ओलावादेखील कमी होतो. त्यामुळे त्वचा कोरडी पडते व डोळे लाल होतात.२. डोकदुखी व स्नायू आकुंचनदिवसेंदिवस एसीच्या थंडीत राहिल्यामुळे डोके दुखते, सांधे आणि स्नायूमध्ये वेदना होतात. काही काळाने वेदना वाढून संधिवात होण्याचीसुद्धा शक्यता असते. ३. सततचा थकवाअधिकाधिक काळ एसीमध्ये राहणाऱ्या अनेकांना सतत एक प्रकारचा थकवा जाणवतो. एसीच्या कृत्रिम वातावरणात ताज्या हवेच्या अभावामुळे असे होऊ शकते.४. श्वसनास त्रासएसी डक्टची जर वेळोवेळी स्वच्छता केलेली नसेल तर त्यामध्ये विविध बॅक्टेरिआ आणि इतर अनेक जीवाणू तयार होतात. त्यामुळे खोकला व श्वसनास अडचणी येऊ शकतात. अशा दूषित आणि शिळ्या हवेमुळे गंभीर संसर्गसुद्धा होऊ शकतो.