ज्याप्रकारे दररोज दोन वेळा ब्रश करणं आवश्यक असतं. तसंच दोन वेळा आंघोळ करणंही गरजेचं असतं. सकाळी झोपेतून उठल्यानंतर स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी आंघोळ करणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे रात्री झोपण्या अगोदर फ्रेश होण्यासाठी तसेच दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी आंघोळ करणं फायदेशीर ठरतं. पण तुम्ही कधी विचार केलाय का? तुमच्या आंघोळ करण्याची पद्धत तुमच्या त्वचेला नुकसान तर पोहोचवत नाही. कदाचित तुम्ही कधी विचार केला नसेल की, आंघोळीदरम्यान करण्यात आलेल्या छोट्या-छोट्या चुका त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे या चुका करण्यापासून दूर राहणं फायदेशीर ठरतं.
जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करणं
थंड पाण्याच्या तुलनेत गरम पाण्यान आंघोळ करणं फायदेशीर ठरतं. खासकरून थंडीच्या दिवसांमध्ये गरम पाण्याने आंघोळ केली जाते. परंतु, या प्रक्रियेदरम्यान जर तुम्ही फार वेळ गरम पाण्याने आंघोळ करत असाल तर तुमच्या त्वचेमध्ये असलेलं इसेंशिअल ग्रीज कमी होत. ज्यामुळे स्किन पोर्स ओपन होतात. परिणामी स्किनमध्ये रेडनेस आणि खाजेती समस्या उद्भवते.
स्किनवर जास्त साबण लावणं
साबणामध्ये अनेक अॅसिडीक गुणधर्म असतात आणि हे स्किनवरील धूळ आणि प्रदूषण बाहेर काढण्यासाठी मदत करते. परंतु, असं केल्याने जास्त साबण स्किनवर लावला तर तुमची त्वचा ड्राय आणि फ्लॅकी होते. त्याचबरोबर अनेक साबणांमध्ये अत्तराचाही वापर केला जातो. त्यामुळे त्याचा सुंगध तुम्हाला अट्रॅक्ट करतो. पण या साबणापासून लांब राहणं उत्तम ठरतं.
केसांना लावलेलं कंडिशनर योग्य पद्धतीने क्लिन न करणं
जेव्हा तुम्ही केसांना कंडिशनर लावता त्यावेळी अनेकदा ते योग्य पद्धतीने स्वच्छ होत नाही. त्यावेळी हे कंडिशनर पाठीच्या त्वचेच्या संपर्कात येतं, ज्यामुळे स्किन पोर्स बंद होतात. यामुळेच पाठीवर अॅक्ने आणि पिंपल्सची समस्या उद्भवते.
आंघोळ केल्यानंतर मॉयश्चरायझर न वापरणं
गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर अंग पुसण्यासाठी टॉवेलचा वापर करता. पण त्यानंतर मॉयश्चरायर लावायला मात्र विसरता. पण असं अजिबात करू नका. त्वचेवर मॉयश्चरायझर लावल्याने ओपन पोर्स बंद होण्यास मदत होते. नाहीतर त्वचा ड्राय होऊन त्यामुळे त्वचेवर खाज येते. जेव्हा आंघोळ केल्यानंतर त्वचा हलकी ओलसर असेल तेव्हा मॉयश्चरायझर लावा. त्यामुळे शरीरावर ड्राय फ्लॅक्स पडणार नाहीत.
शॉवर स्वच्छ करा
शॉवर बंद केल्यानंतर बऱ्याचदा त्यामधून पाणी लिक होत राहतं. त्यामुळे तिथे अनेक बॅक्टेरिया जमा होतात आणि तेच किटाणु तुमच्या त्वचेवर बॅक्टेरिया आणि फंगल जमा होतात. त्यामुळे त्वचेला कोणतंही नुकसान होत नाही.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)