त्वचेवर अनेकदा चामखीळ येत असतात किंवा त्याचे डाग सुद्धा पडत असतात. त्वचेवर लटकत असेलेले काळ्या ब्राऊन रंगाचे डाग त्वचेचे सौंदर्य कमी करू शकतात. आज आम्ही हे डाग कसे घालवायचे हे सांगणार आहोत. सर्वसाधारणपणे पाठीवर आणि काहीवेळा चेहरा आणि मानेच्या त्वचेवर सुद्धा हे लटकणारे डाग येत असतात. कोणतेही कपडे आणि ज्वेलरी घालत असताना या स्किन टॅगचा आपल्याला त्रास होत असतो.
स्किन टॅगला एस्फिब्रोपीथेलियल पॉलीप असं म्हणतात. ही एका प्रकराची त्वचेवरची जखम समजली जाते. सर्वसामन्यपणे चामखीळ अनुवांशिक सुद्धा असू शकते. यासोबतच लठ्ठपणा आणि मधुमेह किंवा गरोदरपणात सुद्धा होण्याची शक्यता असते. घरगुती वापरात असलेल्या काही गोष्टींचा वापर करून तुम्ही चामखीळीपासून सुटका मिळवू शकता.( हे पण वाचा- चमकदार आणि मुलायम त्वचेसाठी आंघोळीच्या पाण्यात टाका दूध, मग बघा कमाल! )
केळ्याच्या सालीचा वापर
सफरचंदाचं व्हिनेगर
सफरचंदाचं व्हिनेगरचे काही थेंब कापसावर घालून तो कापूस त्वचेच्या लटकत असलेल्या पुळ्यांना लावा. काही वेळानंतर तो भाग धुवून टाका. हा प्रयोग केल्यास काही दिवसातच त्वेचवर लटकत असेलेले डाग निघून जाण्यास मदत होईल.
विटामिन ई
लसूण
लसणाचा वापर करून तुम्ही स्किन टॅग काढू शकता. त्यासाठी लसूण सोलून त्याची पेस्ट करून चामखीळ असलेल्या भागांवर लावा. त्यानंतर रात्रभर असंच राहू द्या. सकाळी कोमट पाण्याने धुवून टाका. त्यामुळे त्वचेवरचे डाग निघून जाण्यास मदत होईल.
लिंबाचा रस
लिंबाचा रस मोसच्या जागेवर लावल्याने याची समस्या दूर होते. कापसाने लिंबाचा रस मोसवर लावा आणि त्यावर कापूस तसाच ठेवून द्या. काहीवेळा नंतर त्याभागावरची त्वचा धुवून टाका.
बेकिंग सोडा
चांगल्या त्वचेसाठी फायदेशीर असलेला बेकिंग सोडा मोसवर देखील फायदेशीर आहे. बेकिंग सोडा एरंडीच्या तेलामध्ये टाकून पेस्ट तयार करा आणि मोसवर ही पेस्ट लावा. काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक दिसेल.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)