स्वतःला फिट ठेवण्यासाठी आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी अनेक लोक जिममध्ये जातात. परंतु तुम्हाला माहीत आहे का? जिममध्ये जाण्याआधी तुम्ही अशा काही चुका करता की, ज्यामुळे त्वचा आणि केसांचं नुकसान होतं. जाणून घेऊयात जिममध्ये जाण्याआधी कोणत्या गोष्टी टाळणं गरजेचं असतं त्याबाबत.
1. फाउंडेशनचा वापर करा
अनेक लोक जिममध्ये जाण्याआधी चेहऱ्यावर फाउंडेशन लावून जातात. त्यामुळे त्वचेची रोमछिद्र बंद होऊन जातात आणि घाम येत नाही. त्यामुळे अनेकदा फाउंडेशनचा अति वापर केल्याने पिम्पल्सच्या समस्या होतात.
2. डियोड्रंटचा वापर करा
डियोड्रंटचा वापर केल्याने शरीरावरील रोमछिद्र बंद होतात. ज्यामुळे घाम येत नाही परिणामी टॉक्सिन्सही बाहेर येत नाहीत. त्यामुळे जिममध्ये जाण्याआधी डिओड्रंटचा वापर करणं टाळा.
3. केस घट्ट बांधणे
अनेकदा जिममध्ये जाताना महिला केस वर बांधून जातात. तसेच ते फार घट्ट् बांधलेले असतात. त्यामुळे अनेकदा व्यायाम करताना त्रास होतोच आणि केस फार तुटतात.
4. टॉवेल न धुता वापरू नका
जिममध्ये व्यायाम करून घाम आल्यानंतर तो पुसण्यासाठी टॉवेलचा वापर करतात. परंतु एकच टॉवेल सतत वापरल्याने बॅक्टेरियाचे संक्रमण होण्याचा धोका वाढतो. त्यामुळ सतत एकच टॉवेल वापरू नका. त्यामुळे त्वेचेला इन्फेक्शनही होऊ शकते.
5. केस मोकळे सोडणं
केस मोकळे सोडल्यामुळे व्यायाम करताना त्रास होतो. त्यासोबत त्यांचा गुंता होतो आणि केस तुटतात. त्यामुळे केस मोकळे सोडून जिममध्ये जाऊ नका. त्याचसोबत जिममध्ये व्यायाम केल्यानंतर सतत केसांना आणि त्वचेला हात लावू नका. त्यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका होतो.
6.जिम केल्यानंतर आंघोळ करणं
अनेक लोकं ऑफिसनंतर जिममध्ये जातात त्यावेळी तसेच आंघोळ न करता जातात. त्यामुळे त्वचेवर इन्फेक्शन होण्याचा धोका होतो.