आपण आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतो. पण अनेकदा कितीही उपाय केले तरि काही फायदा होत नाही. आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचं सौंदर्य खुलवू शकता. अनेकदा आपण झटपट सौंदर्य मिळवण्याच्या आश्वासनांवर विश्वास ठेवतो आणि बाजारात मिळणाऱ्या ब्युटी प्रोडक्ट्सचा सर्रास वापर करतो. आज आम्ही काही स्टेप्स सांगणार आहोत, ज्या फॉलो करून तुम्ही चेहऱ्याचं सौंदर्य वाढवू शकता. जाणून घेऊयात काही स्टेप्स...
चेहऱ्यावर करा मसाज
चेहऱ्यावर व्यवस्थित मसाज करा. ज्यावेळी तुम्ही एखादं प्रोडक्ट वापरून चेहऱ्यावर मसाज करता त्यावेळी ते प्रोडक्ट त्वचेच्या आतपर्यंत जातं आणि त्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसतो. याव्यतिरिक्त मसाज केल्याने त्वचेचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं.
तेलाने मसाज करा
तुम्ही चेहऱ्यासाठी असणाऱ्या तेलाचा मसाज करण्यासाठी वापर करू शकता. त्यामुळे तुमच्या हातांना व्यवस्थित स्वच्छ करा. तसेच त्वचेचे पोर्स स्वच्छ करण्यासाठी तुम्ही तेलाचा वापर करू शकता.
अॅक्यूप्रेशर पॉइंट्स ओळखून मसाज करा
चेहऱ्यावर काही अॅक्यूप्रेशर प्वॉइंट्स असतात. हे पॉइंट्स हृदयाच्या आकारामध्ये चेहऱ्यवर पसरलेले असतात. त्यामुळे हे पॉइंट्स ओळखा आणि तीन मिनिटांपर्यंत मसाज करा. ज्या पॉइंट्सवर मसाज केल्याने आराम मिळत असेल त्यावर मसाज करा. त्यामुळे चेहऱ्याला आराम मिळतो आणि ब्लड सर्क्युलेशनही योग्य राहण्यास मदत होते.
मानेवर तेल लावून मसाज करा
नेहमी असं दिसून येतं की, आपल्या डोळ्यांना सूज येते. त्यासाठी मानेवर तेल लावून मालिश करा. यामुळे डोळ्यांमधून पाणी येणाऱ्या समस्येपासून सुटका होते.
भुवयांमध्ये मालिश करा
अनेक लोक सायनसच्या समस्येमुळे चेहऱ्याच्या वेदनांनी हैराण असतात. कधी कधी तर नाकाने श्वास घेतना त्रास होतो. सर्व उपाय केल्यानंतरही जर वेदना ठिक होत नसतील तर भुवयांच्यामध्ये 30 सेकंदांसाठी मसाज करा. वेदना दूर होण्यास मदत होते.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.