जेव्हा जेव्हा आपण डिओड्रंट खरेदी करतो तेव्हा आपण आपल्या आवडीचा सुगंध आणि ब्रॅंडचा विचार करतो. पण डिओ खरे़दी करताना आणखीही काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जर या काही गोष्टींची काळजी घेतली गेली नाहीतर तुम्हाला स्कीन आणि आरोग्याची समस्या होऊ शकते. त्यामुळे डिओ खरेदी करताना खालील 5 गोष्टींची काळजी घ्या.
1) अल्कोहोल फ्रि डिओ
जर तुम्ही रोज डिओचा वापर करत असाल तर तुम्ही नेहमी अल्कोहोल फ्रि डिओ निवडायला हवा. रोज केमिकल युक्त डिओचा अधिक वापर केल्याने त्वचेवर इन्फेक्शन किंवा अॅलर्जी होऊ शकते.
2) स्कीन प्रकारानुसार निवडा डिओ
जर तुमची स्कीन सेंसिटीव्ह असेल, लगेच इन्फेक्शन होत असेल तर डिओची निवड विचारपूर्वक केली पाहिजे. त्यामुळे अॅल्युमिनियम कोलोहायड्रेट असलेल्या डिओची निवड करा, कारण यात कूलिंग इफेक्ट होतो. यामुळे स्कीन अॅलर्जीची भीती कमी होते.
3) जर येत असेल घाम
काही लोकांना खूप जास्त घाम येतो, त्यामुळे काही वेळातच डिओचा प्रभाव कमी होतो. दिवसभरात पुन्हा पुन्हा डिओचा वापर करुनही त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे स्प्रे डिओच्या जागी रोल-ऑन्सचा वापर करा. याचा प्रभाव बराचवेळ राहतो.
4) अंडरआर्म्स सतत शेव्ह करत असाल तर
जे लोक आपल्या अंडरआर्म्सला सतत शेव्ह करत असतात, त्यांना स्प्रे डिओपासून धोका होऊ शकतो. या लोकांना स्टिक असलेल्या डिओचा वापर करायला हवा.
5) डार्क सुगंधापासून दूर रहा
डिओमध्ये फार डार्क सुगंध असेल, तर त्यात आर्टिफिशिअल केमिकलचा वापर अधिक करण्यात आला असेलच. त्यामुळे कमी आणि हलक्या सुगंधाचे डिओ वापरा. यामुळे तुम्हाला अॅलर्जीचा धोका कमी असेल.