आता उन्हाळा सुरू झाल्यामुळे डोळ्यांची काळजी घेण्यासाठी सनग्लासेसचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पण सनग्लासेसचा वापर करत असताना तुम्हाला काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. जुने सनग्लासेस असतील तरी आजच्या फॅशनच्या जमान्यात आपल्याला नेहमी अपडेटेड वस्तु घ्यायच्या असतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्सचा वापर करूनु तुम्ही स्वतःसाठी आकर्षक आणि डोळ्यांसाठी चांगले असलेले सनग्लासेस निवडू शकता.
सगळ्यात आधी सनग्लासेसचा वापर उन्हात करत असता तेव्हा आपल्या डोळ्यात नुकसानकारक अल्ट्रा वॉयलेट रेजपासून डोळ्यांना वाचवत असता. अल्ट्रा वॉयलेट डोळ्यांवर पडल्यामुळे मोतीबिंदू या आजााराची समस्या निर्माण होऊ शकते. उन्हाळ्यात बाहेर पडताना जर तुम्ही सनग्लासेसचा वापर कराल तर डोळ्यांचा त्रास होणार नाही.
उन्हाळ्यात चष्मा लावल्यामुळे तुम्हाला सनबर्न आणि डोळ्यांच्या आजूबाजूचा काळपटपणा दूर करण्यासाठी फायदेशीर ठरेल. तसंच उन्हात सनग्लासेसचा वापर केल्यामुळे तुम्ही जीवघेण्या आजाारांपासून लांब राहू शकता.
सनग्लासेस विकत घेताना या गोष्टींची काळजी घ्या
सनग्लासेस विकत घेताना अल्ट्रा वॉयलेट रेजपासून डोळ्यांवर पडून ताण येणार नाही असे घ्या. तसंच संपूर्ण डोळे झाकले जातील याती खबरदारी घ्या. सनग्लासेसचे वेगवेगळे आकार असतात. त्यामुळे तुमच्या डोळ्यांना सुट करेल आणि संरक्षण करेल अशा सनग्लासेसची निवड करा.
जास्त पातळ असलेल्या लेन्सचे सनग्लासेस तुम्ही विकत घ्या. पातळ लेन्स जास्त रिफ्लेक्टीव्ह असतात. डोळ्यांच्या आरोग्यासाठी असे सनग्लासेस चांगले असतात. सनग्लासेस हे काही प्रमाणात महागडे जरी असतील तरी चांगल्या दर्जाचे असावेत. तसंच ड्स्ट प्रुफ असावेत. ( हे पण वाचा-Corona virus : कोरोनाच्या भीतीने पार्लरला जात नसाल, तर 'ही' सोपी ट्रिक देईल ग्लोईंग त्वचा)
सध्या काळया, निळ्या, लाल, चॉकलेटी या रंगाचे काच असलेल्या सनग्लासेसचा वापर सगळ्यात जास्त केला जातो. पण डोळ्यांना शांतता देण्याासाठी आणि आरोग्य चांगलं राहण्यासाठी हिरव्या रंगाच्या सनग्लासेसचा वापर केल्यास उत्तम ठरेल. ( हे पण वाचा- त्वचेवरील डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी सुट्टीचा फायदा 'असा' करून घ्या....)