बॉडी स्पा फक्त स्किन डीप क्लीन करत नाही तर, बॉडीही रिलॅक्स करतं. यामुळे शरीरामध्ये होणाऱ्या वेदना दूर होतात. तसेच ताणही कमी होण्यास मदत होते. दरम्यान यासाठी लोक अनेक मोठ्या पार्लरमध्ये जातात किंवा अनेक महागड्या ट्रिटमेंट्स घेतात. अनेकदा हे सगळं करणं फार खर्चिक ठरतं. दरम्यान यासाठी तुम्हाला महागड्या पार्लर ट्रिटमेंटमध्ये जाण्याची गरज नाही. कारण तुम्ही बॉडी स्पा घरच्या घरीही करू शकता. त्यासाठी आम्ही काही सोप्या स्टेप्स सांगणार आहोत. जाणून घेऊया स्टेप्सबाबत...
शॉवर घ्या
कोमट पाण्याने शॉवर घ्या, या दरम्यान शॉवर जेल किंवा साबणाचा वापर करा. जेणेकरून शरीर स्वच्छ होईल.
स्क्रब
शॉवर घेतल्यानंतर बॉडी स्क्रब करा. हे पोर्स क्लीन करण्यासाठी मदत करतं. जवळपास 10 मिनिटांपर्यंत स्क्रब केल्यानंतर नॉरमल पाण्याने आंघोळ करा.
हेअर केयर
केसांना तेल लावून मालिश करा आणि गरम पाण्यामधील टॉवेल केसांना बांधून ठेवा. थोडा वेळ टॉवेल केसांना बांधून ठेवा त्यामुळे तेल केसांच्या मुळांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. थोड्या वेळाने शॅम्पूने केस धुवून टाका.
फेसपॅक
फेस क्लीन केल्यानंतर स्क्रब करा आणि त्यानंतर आपल्या आवडीचा फेसपक लावा.
गरम पाणी
बाथटबमध्ये गरम पाणी भरून ठेवा. तुमच्या सोयीनुसार पाणी गरम असेल याची खात्री करा. जास्त गरम पाणी घेऊ नका. त्यामुळे त्वचेला नुकसान पोहोचण्याची शक्यता असते.
ऑइल
पाण्यामध्ये तुमच्या आवडीचं ऑइल एकत्र करा, बाजूला अरोमा कॅन्डल लावा. त्यानंतर बाथटबमध्ये रिलॅक्स होऊन बसा. (बाथ टब नसल्यास ही स्टेप अवॉइड करू शकता. त्याऐवजी मसाज घेऊ शकता.)
मसाज
जवळपास 5 मिनिटांनी बॉडी मसाज करा. यादरम्यान पाण्यातून बाहेर पडण्याची गरज भासणार नाही. प्रेशर पॉइंट्सवर प्रेस करा. यामुळे स्ट्रेस रिलीव्ह करण्यासाठी मदत मिळते. चेहर हलक्या गरम पाण्याने धुवा, नंतर पुन्हा थंड पाण्याने स्वच्छ करा, असं केल्याने पोर्स बंद होतात.
लक्षात ठेवा : होममेड स्पा घेतल्यानंतर लगेचच एसीमध्ये किंवा थंडीमध्ये जाऊ नका. बॉडीचं तापमान नॉर्मल होऊ द्या. नाहीतर तुम्ही आजारी पडू शकता.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.