अनेकजण आपल्या चेहरा चमकवण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. केसांसाठीही नको नको ते करत असतात. कपड्यांचीही खास काळजी घेतली जाते. पण आपल्या मानेवर पूर्णपणे दुर्लक्ष करतात. याकारणाने मान दिवसेंदिवस काळी होत जाते. जे दिसायला तर वाईट असतंच पण याने कपडेही घाण होतात. जर तुमच्या मानेचाही रंग काळा झाला असेल तर आम्ही काही खास टिप्स तुम्हाला सांगणार आहोत. या टिप्सच्या माध्यमातून तुमच्या मानेचा काळेपणा तुम्हाला दूर करता येईल.
बेकिंग सोडा
दोन चमचे बेकिंग पावडर घ्या. त्यात पाणी मिश्रित करुन एक सेमी लक्विड तयार करा. हे मिश्रण काही वेळ मानेवर लावून ठेवा. त्यानंतर मान पाण्याने धुवून घ्या. आठवड्यातून काही दिवस हा उपाय केल्यास मानेचा काळेपणा दूर होण्यात मदत होईल.
कच्ची पपई
कच्ची पपई कापून त्याचे तुकडे करा. आता या तुकड्यांमध्ये गुलाबजल आणि एक चमचा दही टाकून मिश्रण तयार करा. ही पेस्ट मानेवर लावून काही वेळ सुकू द्या. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास तुम्हाला फरक दिसायला लागेल.
लिंबू आणि मध
लिंबू आणि मध एकत्र करुन एक पॅक तयार करा. हा पॅक काही वेळेसाठी मानेवर लावून ठेवा. आंघोळ करताना मान चांगली स्वच्छ करा. या उपायाने मानेचा काळेपणा आणि सुरकुत्याही दूर होती.
लिंबू
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी हे तत्व असल्याने ते एका नैसर्गिक ब्लीचप्रमाणे काम करतं. आंघोळ करण्याआधी लिंबू मानेवर हलक्या हाताने घासा. आठवड्यातून दोन-तिनदा लिंबाचा असा वापर केल्यास फायदा होईल.
(टिप : प्रत्येकाची त्वचा वेगवेगळ्या प्रकारची असते. त्यामुळे वरील पदार्थ काहींच्या त्वचेला सूट होणार नाही. त्यामुळे हे तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वापरा.)