(Image Credit : kaky_makeup)
आपण अनेक लोकांना असं म्हणताना ऐकलं असेल की, पेंन्टिगप्रमाणेच मेकअप करणंही एक कलाच आहे. जर काही बेसिक गोष्टी लक्षात घेतल्या तर तुम्हीही या आर्टमध्ये एक्सपर्ट होऊ शकता. यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुमच्याकडे मेकअपसाठी लागणारं सर्व साहित्य उपलब्ध असणं गरजेचं आहे. त्यामध्ये मेकअप प्रोडक्ट्ससोबतच मेकअप ब्रश असणंही आवश्यक असतं. कारण मेकअप ब्रशशिवाय मेकअप व्यवस्थित करणं अशक्य आहे.
7 ते 8 वर्ष टिकतात चांगल्या क्वालिटीचे ब्रश
मेकअप ब्रश लॉन्ग टाइम इन्वेस्टमेंटप्रमाणे असतो. कारण जर तुम्ही चांगल्या क्वॉलिटीच ब्रश खरेदी करत असाल तर ते 7 ते 8 तास टिकतात. त्यासाठी आपल्या ब्रशला प्रत्येक आठवड्याला चांगल्या प्रकारे स्वच्छ करणं आवश्यक असतं. तसेच ते व्यवस्थित जागेवर ठेवावे. त्यामुळे मेकअप ब्रश खरेदी करताना या सर्व गोष्टी लक्षात घेणं गरजेचं ठरतं.
- सर्वात आधी ब्रश नॅचरल किंवा सिंथेटिक केसांपासून तयार करण्यात आलं आहे, हे ओळखणं आवश्यक ठरतं. जे ब्रश नैसर्गिक केसांपासून तयार करण्यात आलेले असतात. त्यांचा वापर पावडर प्रोडक्ट्स अप्लाय करण्यासाठी करण्यात यावा. तर सिंथेटिक केस असलेले ब्रश लिक्विड आणि क्रिम बेस्ड प्रोडक्ट्स अप्लाय करण्यासाठी करण्यात यावा.
- ब्रशचा शेपही महत्त्वाचा असतो. तुम्ही ब्रश आयशॅडो लावण्यासाठी, ब्लश किंवा मग लिपस्टिक लावण्यासाठी खरेदी करत असाल तर यांसाठी लागणाऱ्या प्रत्येक ब्रशचा आकार वेगळा असतो.
- ब्रॉन्जर, ब्लश आणि पावडरसाठी फ्लफी ब्रशचा वापर करा. जेणेकरून आयब्रो हायलाइट, लिड कलर आणि लिपस्टिकसाठी फ्लॅट ब्रशचा वापर करा.
- वेगवेगळ्या मेकअप प्रोडक्ट्ससाठी वेगवेगळे ब्रश वापरा. एकाच ब्रशने प्रत्येक प्रोडक्ट अप्लाय करू नका.
- तुमच्या मेकअप ब्रश सेटमध्ये कमीत कमी 9 प्रकारचे ब्रश असणं गरजेचं असतं...
ब्लश ब्रश, पावडर ब्रश, फाउंडेशन ब्रश, कंसीलर ब्रश, शॅडो ब्रश, ब्रो ब्रश, काबुकी ब्रश, लिप ब्रश आणि आयलायनर ब्रश.