चेहऱ्याची किंवा त्वचेची काळजी घेणे हे केवळ महिलांचं काम नाहीये. पुरुषांनीही आपल्या चेहऱ्याची काळजी घेणे गरजेचे असते. तर ते अधिक हॅंडसम आणि त्यांचा चेहरा तजेलदार दिसू शकतो. अचानक येणारे पिंपल्स किंवा स्किन इन्फेक्शन कुणासाठीही डोकेदुखी ठरु शकते. पण चांगली बाब ही आहे की, ही समस्या तुम्हाला वेळीच दूर करता येऊ शकते. या टिप्सच्या माध्यमातून तुम्ही चेहऱ्याची स्वच्छता चांगल्याप्रकारे करु शकता. असे केले तर तुमच्या चेहऱ्याची चमक कायम राहील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला फार मेहनत करण्याचीही गरज नाहीय.
महिला सुंदर दिसण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात. पर जमाना फॅशन और ब्युटी का है, त्यामुळे फक्त महिलाच नाही तर अनेक पुरूषही सुंदर दिसण्यासाठी आणि प्रेझेंटेबल राहण्यासाठी प्रयत्न करत असतात. आज आम्हीही पुरूषांना काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून ते स्वतः फ्रेश राहू शकतात आणि स्वतःचा लूकही चेंज करू शकतात.
1. पुरूषांनी स्वतःच्या त्वचेचं उन्हापासून रक्षण करणं गरजेचं असतं. यामुळे चेहऱ्याची त्वचा निस्तेज आणि कोरडी दिसते. जेव्हाही तुम्ही उन्हामध्ये जाणार असाल त्यावेळी चेहऱ्याच्या त्वचेचं रक्षण करण्यासाठी एखादा स्कार्फ किंवा रूमाल बांधा.
2. त्वेचचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी पाणी पिणं गरजेचं असतं. पाण्यामधील तत्व त्वचेची इलास्टिसिटी वाढविण्यासाठी मदत करतात. तसेच त्वचेवर दिसणारी वाढत्या वयाची लक्षण कमी करण्यासाठीही पाणी उपयोगी ठरतं.
3. दररोज सकाळी योगा केल्याने वाढत्या वयाची लक्षणं कमी होतात आणि व्यायामामुळे शरीर मजबुत होतं तसेच त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.
4. पुरूषांनी साबणाचा वापर कमीतकमी करावा आणि जेवढं शक्य असेल तेवढा सोप फ्री फेसवॉशचा वापर करा.
5. चेहरा धुण्यासाठी नेहमी कोमट पाण्याचा वापर करा. शक्य नसल्यास क्लींजर किंवा टोनरच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा.
6. जेवढं शक्य असेल तेवढं व्यसनांपासून दूर रहा. परंतु जर तुम्ही मद्यसेवन करत असाल तर एका ठराविक प्रमाणामध्येच करा. अधिक धूम्रपान आणि मद्यपान केल्यामुळे त्वचेला नुकसान पोहोचतं.