तुम्हालाही दररोज शेड चेंज करून नेल पेंट लावण्याची आवड आहे का? किंवा तुम्हाला ट्रेन्डी शेड्स ट्राय करायला आवडतात का? सध्याच्या बदणाऱ्या वातावरणामध्ये नेलपेंट कलेक्शनमध्ये ग्रीन कलरची चलती आहे. जसं वातावरण चेंज होतं तसचं आपल्या वॉर्डरोबमधील कपड्यांचं टेक्शर आणि कलरही सीझननुसार चेंज होतो. आता नेलपेंट कलर्सचाही यामध्ये समावेश होऊ लागला आहे. सध्या अनेक तरूणी आणि महिला ग्रीन नेलपेंटला आपली पसंती देताना दिसून येत आहेत.
हे शेड्स आहेत उपलब्ध...
सध्या हिरवा रंग ट्रेन्डिगमध्ये असून ग्रीन कलरच्या नेलपेंट्सचे अनेक शेड्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. ऑलिव ग्रीनपासून, ब्राइट ग्रीन, खाकी ग्रीन, अवोकाडो, ग्रास ग्रीन, मिंट ग्रीन आणि ट्रेडिशनल ग्रीन यांसारख्या शेड्सचा समावेश होतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या आवडीचा ग्रीन शेड निवडू शकता. नेलपेंट मार्केटमधील जवळपास सर्वच इंटरनॅशनल ब्रँड्सनी ग्रीन शेड्समधील आपल्या नवीन रेंज लॉन्च केल्या आहेत. ज्यामध्ये ग्रीन कलरच्या शेड्मध्ये अनेक वरायटी मिळतील. या कलेक्शनबाबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे कलर्स अत्यंत सोबर असून तुम्ही या रंगाच्या ड्रेससोबत मॅच करू शकता.
छोट्या नखांवर दिसतात फार सुंदर...
अनेक ब्युटी एक्सपर्ट्सनुसार, हे ग्रीन शेड्स मोठ्या नखांवर सुंदर दिसतातच पण लहान नखांवरही शोभून दिसतात. या शेड्समुळे हटके लूक मिळण्यास मदत होते. यासाठी सर्वात आधी तुम्ही तुमची नखं कापून त्यांना राउंड शेप द्या. त्यानंतर यावर तुमच्या आवडीचा ग्रीन शेड अप्लाय करा.
असं करू शकता टिम-अप
ग्रीन कलरची नेलपेंट अप्लाय करताना लक्षात ठेवा की, हा टोन तुमच्या लूकला कॉम्प्लिमेंट करेल. तुम्ही या शेडमधील वेगवेगळे शेड्स यूज करू शकता. तसेच तुम्ही स्कार्फ किंवा हेअर अॅक्सेसरीजसोबत टिम-अप करू शकता. त्याऐवजी तुम्ही तुमच्या ग्रीन शेडच्या ड्रेससोबतही टिम-अप करू शकता. जर तुम्हाला मिस-मॅच लूक कॅरी करायचा असेल तरिही तुम्ही तुमच्या आवडीचा शेड ट्राय करू शकता.