दम्यावर ‘सॉल्ट रुम थेरपी’ची ईलाज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2016 10:37 AM
हेल्थ एक्सपर्ट दम्यासाठी ‘सॉल्ट रुप थेरपी’ करण्याचा सल्ला देत आहे.
वाढत्या वायूप्रदूषणाचा दूष्परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे. दम्यासारखा आजार लहानथोरांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे.यावर एक उपाय म्हणून ‘सॉल्ट रुप थेरपी’चा पर्याय सध्या प्रचलित होताना दिसतोय. हेल्थ एक्सपर्ट दम्यासाठी ‘सॉल्ट रुप थेरपी’ करण्याचा सल्ला देत आहे. जगभरात विविध ठिकाणी या नव्या थेरपीचे परीक्षणे करण्यात आली असून दम्यावर फार चांगले परिणाम समोर आले आहेत.फोर्टिस वसंत कुंज येथील अनिमेश रे यांनी सांगितले की, हवेच्या प्रदूषणामुळे तरुण, सदृढ युवकांनी दमा होत आहे. अशा गंभीर समस्येवर ‘सॉल्ट रुम थेरपी’सारखा नैसर्गिक उपाय करणे रुग्णांसाठी खूप लाभदायक आहे.या उपचार पद्धतीमध्ये रुग्णांना एका खोलीमध्ये बसवतात. या खोलीच्या सर्व भिंतीवर मिठाचा थर चढवलेला असतो. खोलीमध्ये हवेखी झुळूक सोडण्यात येते. या हवेमुळे मिठाचे सुक्ष्म कण हवेत मिसळतात आणि रुग्ण ते श्वसनाद्वारे आत घेतात.नाक आणि श्वसननलिकेतून जाताना हे मिठाचे कण बॅक्टेरिआ आणि मार्गातील ब्लॉकेज दूर करतात.