आता हिवाळ्याला सुरुवात झाली नाही पण हिवाळ्यात त्वचेला होणाऱ्या समस्यांची काळजी आतापासून घेतली पुढे जास्त त्रास होणार नाही. हिवाळ्यात अनेकांना त्वचा कोरडी पडण्याची समस्या होत असते. अनेक उपाय करुनही चेहऱ्याचा कोरडेपणा दूर होत नाही. या वातावरणात केवळ तुमचा चेहराच नाही तर शरीराच्य वेगवेगळ्या अंगांना ही समस्या होते. त्यामुळे तुमच्या सौंदर्यात कमतरता येते.
पण जर तुम्हाला हिवाळ्यातही तुमच्या त्वचेची सुंदरता कायम ठेवायची असेल तर काही गोष्टी फॉलो केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. आठवड्यातून एकदा तुम्ही बेसन आणि दह्याचा फेस पॅक वापरु शकता. एक चमचा बेसनात दोन चमचे दही मिश्रित करा आणि ते हातांवर लावा. काही वेळाने हात धुवा. तुम्हाला हवं असेल तर दोन चमचे बटर आणि एक चमचा बदामाचं तेल मिश्रित करुन तुम्ही वापरु शकता. याने त्वचा मुलायम होईल आणि डागही दूर होतील.
मसाज करा
चेहऱ्याची मसाज असो वा डोक्याची याने तुमच्या निर्जीव त्वचेमध्ये जीव येतो. असे हातांबाबतही आहे. हातांची मसाज केल्याने ब्लड सर्कुलेशन वाढतं आणि त्वचेचा डलनेस कमी होतो. दर दोन दिवसांनी रात्री बादामांचं कोमट करुन हातांची मसाज करा, याने त्वचा मॉश्चराइज आणि मुलायम होईल.
स्क्रब करा
डेड सेल्स जमा झाल्याने तुमची त्वचा रफ आणि कोरडी होते. यापासून बचाव करण्यासाठी चेहऱ्याप्रमाणे हातांनाही नियमीत स्क्रब करण्याची गरज आहे. यासाठी एक चमचा साखर आणि मध मिश्रित करुन हातांवर लावा, दोन मिनिटे स्क्रब करा आणि हात धुवा. आठवड्यातून एक-दोनदा असे केल्याने फायदा होईल.
नखांचीही घ्या काळजी
हातांची सुंदरता वाढवण्यात नखांचीही मोठी भूमिका असते. यासाठी नियमीत रुपाने नखांची व्हिटमिन इ ऑईलने मसाज करा. सोबतच जेव्हा थंडी जास्त असेल तेव्हा ग्लव्स वापरा. याने नखांचाही ड्राय होण्यापासून बचाव होईल.