सौंदर्य वाढविण्यात केसांची फार महत्त्वाची भूमिका असते. पुरूषांपेक्षा महिला आपल्या केसांवर अधिक एक्सपरिमेंट करताना दिसतात. मग ते वेगवेगळ्या हेअर स्टाईल्स असो किंवा हेअर कलर्स. नवीन आणि ट्रेन्डी फॅशन्स त्या नेहमीच ट्राय करतात. परंतु तुम्हाला माहीत आहे का? जर नेहमी केस घट्ट बांधून ठेवत असाल तर तुम्हाला केसांच्या वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या समस्येकडे दुर्लक्ष केलं तर टक्कलही पडू शकतं.
केस सतत घट्ट बांधून ठेवल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्येला ट्रॅक्शन एलोपिसिया (traction alopecia) असं म्हणतात. या समस्येमुळे केसांची मुळं कमकुवत होतात आणि केस गळण्याची समस्याही होते. केस घट्ट बांधल्यामुळे मानेजवळचे केस तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे डर्मटालॉजिस्ट केस सैल बांधण्याचा सल्ला देतात.
हेअर एक्सपर्ट्सनी सांगितल्यानुसार, फक्त महिलांनाच नाही तर ज्या पुरूषांचे केस लांब आहेत आणि ते त्यांना घट्ट बांधून ठेवतात. त्यांनाही या समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा अशा पुरूषांनाही टक्कल पडण्याची शक्यता असते. संशोधनानुसार, शिख समुदायाच्या लोकांना या समस्येचा अधिक सामना करावा लागतो. कारण ही लोकं त्यांचे केस जास्तीत जास्त वेळासाठी घट्ट बांधून ठेवतात. तुम्हालाही केस गळण्याची समस्या असेल किंवा गरजेपेक्षा जास्त केस गळाल्यामुळे तुमच्याही डोक्यावर टक्कल पडलं असेल, तर एलोपेसियासाठी होमियोपथी आणि हेयर लॉस ट्रिटमेंट ट्राय करू शकता. परंतु कोणतीही ट्रिटमेंट फॉलो करण्याआधी तज्ज्ञांचा सल्या घ्या.
एलोपेसियापासून बचाव करण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे केस सैल बाधाणं. तसेच झोपताना केस सैल बाधावे किंवा मोकळे सोडावे. जर तुम्हाला असं वाटतं असेल की, तुम्ही बांधलेले केस किंवा हेयर स्टाइल जास्त घट्ट आहे. तसेच त्यामुळे डोकंही दुखत असेल तर तत्काळ केस सैल करा किंवा मोकळे सोडा.