How To Make Teeth White Naturally: दात आपल्या चेहऱ्याची सुंदरता आणि आपल्या पर्सनॅलिटीचा महत्वाचा भाग असतात. जर दात चमकदार आणि पांढरे असतील तर आपला आत्मविश्वासही वाढतो. पण जर दात पिवळे असतील तर यामुळे अनेकदा लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागतो. इतकंच नाही तर चारचौघात तुम्ही मोकळेपणाने हसूही शकत नाहीत.
दात पिवळे होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. जसे की, दातांची योग्यपणे स्वच्छता न करणे, जास्त चहा किंवा कॉफीचं सेवन, तंबाखू वा सिगारेटचं सेवन इत्यादी. तुमचेही दात पिवळे झाले असतील आणि तुम्हाला ही समस्या दूर करायची असेल तर आम्ही तुम्हाला एक नॅचरल उपाय सांगणार आहोत. यासाठी तुम्ही केळीच्या सालीची मदत घेऊ शकता. याने दातांवरील पिवळेपणा जाऊन दात पांढरे आणि चमकदार होतील.
केळीच्या सालीने दात चमकवा
केळीच्या सालीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मॅगनीजसारखे मिनरल्स आढळतात. जे दात पांढरे होण्यास मदत करतात. मात्र, जर तुम्ही केळीच्या सालीमध्ये आणखी एक गोष्टी मिक्स केली तर याचा प्रभाव अधिक होऊ शकतो. केळीच्या सालीमध्ये तुम्ही बेकिंग सोडा मिक्स करू शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्ही एक पिकलेलं केळ आणि एक चमचा बेकिंग सोडा घ्या.
कसा कराल उपाय?
सगळ्यात आधी केळीच्या साल घ्या आणि सालीचा आतला भाग दातांवर घासा. दातांवर सगळीकडे साल घासा जेणेकरून त्यातील पोषण दातांना मिळेल. नंतर एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात थोडं पाणी टाकून पेस्ट बनवा. ही पेस्ट केळीच्या सालीसोबत दातांवर लावा. दोन ते तीन मिनिटे तशीच ठेवा आणि नंतर पाण्याने गुरळा करा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता.
कसा फायदेशीर ठरतो हा उपाय?
केळीच्या सालीमध्ये आढळणारे खनिज दातांच्या आता जाऊन पिवळेपणा कमी करतात. तर बेकिंग सोडा एक नॅचरल स्क्रबरसारखं काम करतं. ज्यामुळे दातांवरील डाग दूर होण्यासही मदत मिळते. त्याशिवाय बेकिंग सोड्यामध्ये क्षारीय गुण असतात. जे दातांचा पिवळेपणा कमी करण्यास मदत करतात.
या उपायाचे फायदे
- हा उपाय पूर्णपणे नॅचरल आहे आणि याचे कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीत. हा उपाय तुम्ही नियमितपणे करू शकता.
- केळी आणि बेकिंग सोडा घराघरांमध्ये असतो. ज्यामुळे यासाठी तुम्हाला फार काही खर्च करण्याचीही गरज नाही.
- आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यावर काही दिवसांमध्ये तुम्हाला दातांमध्ये फरक दिसायला लागेल.