चेहरा स्वच्छ, सुंदर आणि चमकदार करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. अनेकदा महागड्या पार्लर ट्रिटमेंट किंवा बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा वापर करण्यात येतो. पण एवढं करूनही काही उपयोग होत नाही. बऱ्याचदा यामुळे त्वचेला आणखी नुकसान पोहचते. अशावेळी घरगुती उपाय करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. त्याची अनेक कारणं आहेत. त्यातल्यात्यात सांगायचे झालेच तर घरगुती उपाय अपायकारक नसतात म्हणजेच त्यामुळे त्वचेला कोणतंही नुकसान होत नाही. तसेच यासाठी पैसे खर्च करावे लागत नाही. स्वयंपाकघरात अगदी सहज होणाऱ्या या गोष्टी असतात. अशाच काही पदार्थांचा वापर करून तुम्ही घरच्या घरी त्वचेसाठी फायदेशीर स्प्रे तयार करू शकता. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्ससोबतच टॅनिंगचा त्रास होऊ लागतो. त्यावेळी त्वचेला थंडाव्याची आवश्यकता असते. त्यासाठी तुम्ही ग्रीन टी फेशियल स्प्रे चा वापर करू शकता. हा स्प्रे तुम्ही घरच्या घरी अवश्य करू शकता. जाणून घेऊया स्प्रे कसा तयार करावा त्याबाबत...
साहित्य :
- ग्रीन टी
- टी ट्री ऑइल
- लेमन ऑइल
- गरम पाणी
- स्प्रे बॉटल
कृती :
- गरम पाण्यामध्ये ग्रीन टी बॅग डिप करून ठेवा.
- थोड्या वेळाने बॅग काढून टाका आणि तयार ग्रीन टी थंड करून ठेवा.
- त्यानंतर ग्रीन टी, टी ट्री ऑइल, लेमन ऑइल, गरम पाणी एकत्र करून रिकाम्या स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.
- चेहऱ्यावरील धूळ, मातीपासून सुटका मिळवण्यासाठीही तुम्ही याचा वापर करू शकता.
फायदे :
1. चेहऱ्याला थंडावा मिळण्यासाठी स्प्रे फायदेशीर ठरेल.
2. चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी उपयोगी ठरेल.
3. ग्रीन टीमध्ये एपिगलोकेटेशिन गलॅट (EGCG) असतं. जे स्किन फ्रेश ठेवण्यासाठी उपयोगी ठरतं. त्यामुळे वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यासाठीही हे फायदेशीर ठरतं.
4. ग्रीन टी फेशियल स्प्रे पिंपल्स आणि ओपन पोर्सच्या समस्येवर परिणामकारक ठरतो.