उन्हाळ्यामध्ये त्वचेचा उजाळा काही केल्या टिकवून ठेवता येत नाही. तुम्ही घराच्या बाहेर जा किंवा नका जाऊ. सूर्याची प्रखर किरणं तुमच्या त्वचेचा ग्लो कमी करतात. यापासून बचाव करण्यासाठी बाजारात असलेल्या केमिकलयुक्त कॉस्मेटिक्स हाच एक उपाय नाही. किचनमध्ये असलेले काही पदार्थांचा वापर केल्याने तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य टिकवून ठेवता येतं. यासाठी तुम्ही टोमॅटोचा वापर करू शकता. टोमॅटोमध्ये लायकोपीन असतं, जे अल्ट्रावॉयलेट किरणांचा साइड इफेक्ट कमी करतात. याव्यतिरिक्त तुम्ही स्किनवर लावून तुमचा ग्लो पुन्हा मिळवू शकता.
जाणून घेऊया टॉमेटोपासून फेसपॅक तयार करण्याच्या पद्धतीबाबत...
टोमॅटो आणि मध डल स्किनचा ग्लो परत मिळवण्यासाठी टोमॅटो आणि मधाचा फेस मास्क बेस्ट ठरतो. मास्क तयार करण्यासाठी अर्धा टॉमेटो घेऊन ब्लेंड करा. यामधअये एक चमचा मध एकत्र करा. ही पेस्ट चेहऱ्यावर 15 मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करून कोरडा करा.
टोमॅटो आणि लिंबाचा फेस पॅक
स्किन टॅनिंग हटवण्यासाठी टोमॅटो आणि लिंबाचा फेस पॅक मदत करतो. टॉमेटोच्या पेस्टमध्ये लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावून तसचं ठेवा. सूकल्यानंतर चेहरा पाण्याने सवच्छ करा. तुम्हाला फरक जाणवेल. त्वचेवरील मृतपेशी निघून जातील आणि ग्लोइंग स्किन मिळेल.
टोमॅटो, लिंबू आणि दही
टोमॅटो, दही आणि लिंबाचा रस एकत्र लावल्यामुळे त्वचेला फायदा होतो. हा मास्क नॅचरल ब्लीचचं काम करतो. या मास्कमुळे चहेऱ्यावरील त्वचेचे केस कमी होतात. त्वचा तजेलदार आणि चमकदार होते.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.