महिला असो अथवा पुरूष आपल्या प्रायव्हेट पार्टसवरचे केस काढण्यासाठी रेजरचा वापर करत असतात. कारण प्रायव्हेट पार्टसवरचे केस काढण्यासाठी प्रत्येकवेळी पार्लरला जाणं शक्य नसतं. पण याचा परिणाम असा होतो की तुम्ही ज्या भागावरचे केस काढण्यासाठी रेजर वापरत आहात त्या भागाच्या त्वचेवर वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवत असतता. खाज येणे, त्वचा लाल होणे, सुज येणे हा त्रास सहन करावा लागतो. जर तुम्हाला सुद्धा प्रायवेट पार्टसवरचे केस काढताना त्रास होत असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
(image credit- Electric razors)
क्रिम किंवा जेलचा वापर
शेविंग करताना अनेकदा घाईत असतान ड्राय शेव केली जाते. त्यामुळे तुम्ही त्वचेच्या अनेक समस्यांना निमंत्रण देऊ शकता. नंतर अनेक दिवस तुम्हाला खाज येण्याची समस्या उद्भवू शकते. तसंच केस खडबडीत होऊ शकतात म्हणून ड्रायशेव करणं टाळा. शेव करण्याआधी त्वचेवर क्रिम अप्लाय करून मगचं शेव करा.
अचूक डायरेक्शन
प्रायव्हेट पार्टसवरचे केस काढत असताना ते योग्य दिशेने काढायाला हवेत. ज्या दिशेने तुमच्या केसांची वाढ होत आहे. त्याच्या विरूध्द बाजूने केस काढल्यास फायदेशीर ठरेल. कारण ज्या बाजूने केस उगवतात त्याच बाजूने शेव केल्यास व्यवस्थित केस उगवणार नाही. त्यामुळे त्या ठिकाणची त्वचा कोरडी सुद्धा पडू शकते. कारण मुळात प्रायव्हेट पार्टसरचे केस उलट्या सुलट्या दिशेने उगवतात.
धार नसलेले रेजर
खराब झालेल्या किंवा ब्लेडला धार नसलेल्या रेजरचा वापर अजिबात करू नका. क्लीन आणि चांगल्या शेव्हिंगसाठी शार्प रेजर किंवा इलेक्ट्रॉनिक ट्रिमरचा वापर करा. जर तुम्हाला वाटत असेल की, रेजर स्कीनवर स्मूथली चालत नाहीये, तर हा संकेत आहे की, तुम्ही रेजर बदलायला हवं.
रेजरच्या वापरानंतर अशी घ्या काळजी
कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही प्रायव्हेट पार्टसमध्ये शेव्हिंग जेलचा वापर करू शकता. असं केल्याने रेजरही स्कीनवर सहजपणे काम करेल. शेव्हिंगनंतर एखादं क्रीम किंवा तेल लावा, याने स्कीन मुलायम राहण्यास मदत मिळेल. त्या भागांची हलक्या हाताने मसाज करा. असं केल्यास त्या भागावरच्या त्वचेला त्रास होणार नाही.